अनिल देशमुख प्रकरण: पारदर्शकता हेच आमचे नैतिक मूल्य  Saam tv news
महाराष्ट्र

अनिल देशमुख प्रकरण: पारदर्शकता हेच आमचे नैतिक मूल्य

अनिल देशमुख यांच्या संस्थांवर इडीने मारलेल्या छाप्यांवर संस्थेने मोठा खुलासा केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मीडियामध्ये आलेल्या बातम्या बिनबुडाच्या आणि खोट्या आहेत. विदर्भातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तसंच अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण मिळावे म्हणून श्री साई शिक्षण संस्था ( SSSS ) ही धर्मादाय शिक्षण संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. श्री साई शिक्षण संस्था ही विदर्भाच्या विकासात मोलाचा वाटा देऊ शकतील अशा विद्यार्थ्यांना घडवत आहे. अशा शब्दांत माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या साई शिक्षण संस्था, NIT इंजिनिअरिंग कॉलेजने खुलासा केला आहे. अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्था, NIT इंजिनिअरिंग कॉलेजवर ईडीने छापा मारला होता. सहा ऑगस्ट रोजी ही कारवाई झाली होती. (Anil Deshmukh case: Transparency is our moral value)

श्री साई शिक्षण संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने अतिशय दर्जेदार तांत्रिक शिक्षण आणि सुविधा पुरवल्या जातात. उद्योग क्षेत्राला आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ, नवनवीन उद्योजक आणि टेक्नोक्रॅट पुरवण्यासाठी तसंच भविष्यातील ध्येयपूर्ती करण्यासाठी साई शिक्षण संस्था कार्यरत आहे.

अलीकडे काही प्रसारमाध्यमांमध्ये साई शिक्षण संस्था, NIT यांच्या विषयी अतिशय बिनबुडाच्या आणि खोट्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या असून यामुळे संस्थेची प्रतिमा आणि समाजातील स्थान यावर विपरीत परिणाम होत आहे. वास्तविक श्री साई शिक्षण संस्था, एनआयटी आणि इतर तांत्रिक संस्था यांमधील कारभार अतिशय पारदर्शक आहे.

पारदर्शकता हे आम्ही नैतिक मूल्य म्हणून स्वीकारले आहे, आमच्या संस्थेतील सर्व खाती जमाखर्च या लेखापरीक्षण केलेल्या आहेत तसेच सक्षम प्राधिकरण यांकडून तपासल्या गेलेल्या आहेत. आमचे सर्व जमाखर्च आयकर अधिकारी आणि धर्मादाय आयुक्तांकडूनही वेळोवेळी तपासले गेलेले आहेत. कोणत्याही शासकिय यंत्रणेला अथवा अधिकार्‍यांना आमच्या कोणत्याही कारभारामध्ये काहीही गैर आढळलेले नाही.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

Vice President Election: इंडिया आघाडीची मतं फुटली; कोणी केली क्रॉस व्होटींग, कुठे गेम फिरला?

Wednesday Horoscope : संकष्टी चतुर्थीला बाप्पा ५ राशींच्या लोकांची इच्छा पूर्ण करणार; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Nepal Crisis : माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, आंदोलकांनी पेटवलं होतं घर

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT