anganwadi sevika morcha in sangli
anganwadi sevika morcha in sangli saam tv
महाराष्ट्र

'मविआ' सरकारला जागं करण्यासाठी हजारो अंगणवाडी सेविका उतरल्या रस्त्यावर

विजय पाटील

सांगली : महाविकास आघाडी सरकारने (mva) सत्तेत आल्यावर अंगणवाडी सेविकांना (anganwadi worker) मानधन वाढ करतो असे आश्वासन दिले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने अद्यापी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ न केल्याने जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांना आज सांगली (sangli) जिल्हा परिषदेवर माेर्चा काढला. (sangli latest marathi news)

अंगणवाडी सेविकांना पेन्शन नव्याने सुरू करण्यात यावी. अंगणवाडीत नवीन मोबाईल देण्यात यावेत तसेच मानधनात वाढ करावी या व अन्य मागण्यांसाठी हा इशारा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील हजारो महिला सेविका सहभागी झाल्या होत्या.

रणरणत्या उन्हात महिलांनी मोर्चा काढला हाेता. उन्हाची काहिली झाल्याने काही सेविका छत्री घेऊन माेर्चात सहभागी झाल्या. जिल्हा परिषदेचा परिसर महिलांनी घाेषणा देत दणाणून साेडला. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदाेलन (andolan) छेडण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Arvind Kejriwal Bail| अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून जामीन मंजूर, प्रचाराचा मार्ग मोकळा

Mira Rajput Kapoor : बॅकलेस सूटमध्ये शाहिदच्या पत्नीचा किलर लूक

Ravindra Waikar: ऐन निवडणुकीत रवींद्र वायकर शिंदे गटात गेले, ठाकरे गटाने पाठवली नोटीस

Priya Bapat-Umesh Kamat: प्रिया-उमेशचा रोमँटिक अंदाज; ट्रीपचे फोटो पाहा

SCROLL FOR NEXT