लातूर - जिल्ह्यातील गणेशवाडी Ganeshwadi येथे प्राचीन काळातील हेमाडपंथी मंदिर Temple असून या मंदिराची पडझड झाली आहे. पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे या मंदिराची दुरावस्था झालेली आहे. प्राचीन काळातील हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर Ancient temple आहे. शासनाने वेळीच लक्ष देऊन पडझड होत असलेल्या मंदिराचे जतन करावे अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
लातूर जिल्ह्यातील हिपळगाव आणि गणेशवाडी या ठिकाणी प्राचीन हेमाडपंथी मंदिरे स्थापन आहेत. गणेशवाडी मध्ये जलाशय आणि पाठशाळा निर्माण केल्याची माहिती इस 1099 च्या शिलालेखात मिळते. या मंदिराला नऊशे वर्ष पूर्ण झाल्याची माहिती इतिहासा मधून मिळते. प्राचीन काळातील हेमाडपंथी मंदिराचे जतन करावं अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
हे देखील पहा -
इ .स दहाव्या शतकाच्या अखेरीस दक्षिणेची सार्वभौम सत्ता राष्ट्रकूट कडून कल्याणीच्या चालुक्य कडे गेली. सत्तेत बदल झाला तरी प्रारंभी चालुक्यांनी माळखेड इथून राजधानी हलविली नाही. अकराव्या शतकाच्या मध्यात चालुक्य राजा पहिला सोमेश्वर याने ती कल्याणपुर म्हणजेच आत्ताचे बसवकल्याण येथे हलवली. बसवकल्याण हे लातूरपासून जवळच असल्याने चालुक्य काळात लातूर परिसरातील राजकीय व सांस्कृतिक हालचालींना विशेष गती मिळाली.
कदाचित यामुळेच लातूर जिल्ह्यात आजवर प्राप्त झालेल्या शीलालेखांपैकी अर्ध्याहून अधिक कल्याणी चालुक्य राजवटीतील लेख आहेत. या कालावधीत चालुक्यांच्या कित्येक सामंतानी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लातूर परिसरात अनेक मंदिरे उभारली.त्याचप्रमाणे पाठशाळा आणि जलाशय निर्माण केली .याची सर्व माहिती शिलालेखात मिळते. विशेष म्हणजे आज ही पाठशाळा आणि जलाशय या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर प्राचीन मंदिरे आणि वास्तूंचे जतन व्हावे अशी आशा इतिहास संशोधक विवेक सौतडेकर यांनी व्यक्त केले आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.