परभणीकर जिंकलेच; आंचल गोयल पुन्हा कलेक्टर, नेत्यांची झाली फजिती Saam Tv News
महाराष्ट्र

परभणीकर जिंकलेच; आंचल गोयल पुन्हा कलेक्टर, नेत्यांची झाली फजिती

शासनाने, नेते व कार्यकर्ते यांच्या दबावाला बळी न पडता आंचल गोयल यांना पुन्हा एकदा परभणीचे जिल्हाधिकारी पद स्वीकारण्याची जबाबदारी दिली आहे.

राजेश काटकर

परभणी : परभणीकर जनतेच्या रेट्यापुढे मुख्यमंत्री कार्यालय नमले असून अखेर शासनाने, नेते व कार्यकर्ते यांच्या दबावाला बळी न पडता आंचल गोयल यांना पुन्हा एकदा परभणीचे जिल्हाधिकारी पद स्वीकारण्याची जबाबदारी दिली आहे. (anchal goyal has become again collector of parbhani)

हे देखील पहा -

आय.ए.एस.आधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारावा, त्यांना रुजू करून घेतलेच पाहिजे अशी मागणी करत “जागरूक नागरिक आघाडी” परभणीच्या वतीने काल सोमवार राज्य शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. अखेर शासनाने आय.ए.एस.आधिकारी श्रीमती आंचल गोयल ह्या परभणी जिल्हाधिकारी म्हणून रूजू होणार हे आज निश्चित केले.

31 जुलैला दुपारपर्यंत त्या पदभार घेणार असेच सर्वसामान्यांना वाटत होते. मात्र त्या दिवशी दुपारनंतर अचानक मुगळीकर यांनी राज्य शासनाच्या आदेशावरून अतिरिक्‍त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सोपविला. मात्र परभणीकरांनी आंदोलन करता मुख्यमंत्र्यांना ठराव व निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत पाठवले. अखेर परभणीकरांच्या मागणीला आज खरं यश मिळालं अस म्हणल्यास ते चूक ठरणार नाही. लवकरच श्रीमती गोयल परभणीत जॉईन होऊन पद्धभार स्विकारणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

Nandurbar Accident : धुळे- सुरत महामार्गावर दोन भीषण अपघात; कोंडाईबारी घाटात वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT