आनंद महिंद्रांनी शब्द पाळला! सांगलीच्या दत्तात्रयला बोलोरो गाडी गिफ्ट  Saam TV
महाराष्ट्र

आनंद महिंद्रांनी शब्द पाळला! सांगलीच्या दत्तात्रयला बोलोरो गाडी गिफ्ट 

दत्तात्रय लोहार यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही मिनी जिप्सी बनवली आहे.

विजय पाटील

सांगली: सांगलीच्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी मुलाच्या हट्टा पायी जुगाड करत त्यांच्या कल्पकतेने बनवलेल्या मिनी जिप्सीमुळे देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांची देशभरात ओळख झाली. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी चक्क बोलेरो देतो असे ट्विट केले. आणि आज महिंद्रा कंपनीने  बोलेरो दत्तात्रय लोहार यांना सुपूर्त केली आहे, व दत्तात्रयने त्यांची मिनी जिप्सी महिंद्रा कंपनीकडे दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी दिलेला शब्द खरा केला. यामुळे आज लोहार कुटुंबीय आनंदी आहेत. यावेळी बोलेरो गाडीचे पूजन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम यांनी केले.

दत्तात्रय लोहार यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही मिनी जिप्सी बनवली आहे. आपल्या मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्येयवेड्या दत्तात्रयने गाडी तयार करण्यासाठी स्वतःच्या शेतातील ऊस विकून गाडीचे साहित्य आणले. कुटुंबातील सर्वांची साथ मोलाची लाभली. दत्तात्रय लोहार यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. फॅब्रिकेशनचा त्यांचा व्यवसाय आहे. ते कामही त्याने फॅब्रिकेशन दुकानात बघून शिकला आहे. मिनी जिप्सी तयार केल्यामुळे त्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राणेंचं स्टिंग ऑपरेशन, महायुतीची पोलखोल, भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैशांची बॅग

नोकरी सोडल्यानंतर किती दिवसांत फुल अँड फायनल सेटलमेंटची रक्कम मिळणार? जाणून घ्या नव्या कामगार कायद्याचे नियम

Mahavatar Narsimha: 'महावतार नरसिंह' ऑस्करच्या शर्यतीत; 'डेमन हंटर्स'सह 'या' पाच चित्रपटांना देणार टक्कर

पालिका निवडणुकीतही 50 खोके, भाजप आमदाराच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Live News Update: पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या

SCROLL FOR NEXT