Latur News Saam Tv
महाराष्ट्र

Latur News|लातूर जिल्ह्यातील हासोरीत भूकंप नाही मग घरं हादरवणारा आवाज कसला? नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

लातूर जिल्ह्यातील हासोरी या गावात मंगळवारी रात्री भूकंपासारखा आवाज येऊ लागला.

दिपक क्षीरसागर

लातूर: लातूर (Latur) जिल्ह्यातील हासोरी या गावात मंगळवारी रात्री भूकंपासारखा आवाज येऊ लागला. त्यामुळे भूकंपाच्या भितीने गावातील नागरिक रात्री १०.१२ मिनिटांनी घराबाहेर येऊन थांबले. अचानक जमीन हादरण्याचा आवाज आल्याने भूकंपाच्या भीतीने अनेकांनी घरं सोडली. गावात सगळीकडे धावपण सुरू होती. एकाबाजूला बाहेर पाऊस तर दुसरीकडे जमीन हादरवणारा आवाज येत होता. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेली माहिती अशी, लातूर (Latur) जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी गावात व परिसरातील गावात ५ व ७ सप्टेंबर रोजी भूकंपासारखा धक्का जाणवल्याची माहिती गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला दिली. यावेळी लातूर येथील भूगर्भ शास्त्रज्ञांनी भेट देऊन लोकांशी चर्चा केली. आणि हा भूकंप नाही व तशी कोणतीही नोंद झालेली नसल्याची माहिती दिली. त्यामुळे लोकांनी घाबरु नये असेही सांगितले.(Latur Latest News)

पण पुन्हा काही दिवसांनी असाच आवाज येऊ लागला. रात्री १० वाजून १५ मिनिटांनी भूकंप झाल्याचे लोकांना जाणवले त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊन आरडाओरड सुरू झाली. संपूर्ण गाव रस्त्यावर आले. लोक भीतीपोटी घरी झोपायला तयार नाहीत, तर दुसरीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे बाहेरही झोपू शकत नाही, अशा अवस्थेत गाव आहे. या घटनेचे गांभीर्य प्रशासन घेवून वस्तुस्थितीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. (Latur Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health And Weight Loss: साठीत असताना तिशीतील सौंदर्य आणि फिटनेस हवी? मग या ३ गोष्टी फॉलो करा

Maharashtra Live News Update: काँग्रेसला सोबत घ्या, राज ठाकरेंची इच्छा

लेकीच्या प्रेम विवाहाला कडाडून विरोध, जावईच्या आईला जिवंत जाळलं, मुलीच्या आई - वडिलांचा प्रताप

खळबळजनक! निवडणुकीआधी महाराष्ट्रातील मतदार यादीत घोळ, एकाच पत्त्यावर तब्बल २०० जणांची नोंद

Toothpaste Scam Alert : तुम्ही बनावट टूथपेस्ट तर वापरत नाही? कारण आले समोर, वाचा नेमकं प्रकरण काय आहे

SCROLL FOR NEXT