दुर्दैव ! वृद्ध आई-वडीलास मुलाने मारहाण करीत काढलं घराबाहेर संजय जाधव
महाराष्ट्र

दुर्दैव ! वृद्ध आई-वडीलास मुलाने मारहाण करीत काढलं घराबाहेर

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माळी गावातील जवळपास ८० वर्षाच्या वर वय असलेल्या वृद्ध आई वडिलांस मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल आहे.

संजय जाधव

संजय जाधव
बुलढाणा : बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील देऊळगाव माळी गावातील जवळपास ८० वर्षाच्या वर वय असलेल्या वृद्ध आई वडिलांस मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल आहे. हे शर्मेच कृत्य त्यांच्याच मुलाने केलं आहे. विनोद फलके हा या वृद्ध दाम्पत्याचा मुलगा असून तो या गावचा माजी उपसरपंच आहे.

या वृद्ध दाम्पत्याला आता सहारा नसल्याने त्यांनी आपबिती जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांकडे लेखी तक्रार देऊन केली आहे व न्यायाच्या अपेक्षेत रस्त्यावर फिरत आहेत.

हे देखील पहा-

८० वर्षीय परशराम फलके व गीताबाई फलके आहेत. कधी जन्मभरात जिल्हाधिकारी कार्यालय बघितलं नव्हतं. आज त्यांच्या करंट्या मुलामुळे या वयात न्याय मागण्यांसाठी इथं त्यांना यावं लागलं आहे. जन्मदात्या मुलाने या वयात त्यांना मारहाण करत घराबाहेर काढलं आहे. इतकच नाही तर कुण्या नातेवाईकाकडे सुद्धा जाऊ देत नाही. अशा या मुलाची तक्रार घेऊन ८० वर्षीय परशराम व गीताबाई आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले आहे. ते ही पोटच्या मुलाकडून होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी!

या दाम्पत्याला दोन मुलं आहेत मोठा मुलगा विनोद याने तो माजी उपसरपंच असताना आईवडिलांची शेती व घर आपल्या नावावर बॅंकेत कर्ज काढतोय या खोट्या कारणाने आई वडिलांची सही घेऊन करून घेतलं. लहान भाऊ हा बाहेरगावी असल्याने तो गावी आला तेव्हा त्यालाही बेदम मारहाण केली गेली. त्यामुळे आपल्या उतार वयात व जीवनाची मोजकीच वर्ष शिल्लक असताना आता या वृद्द दाम्पत्यास जिल्हा मुख्यालयात न्यायासाठी यावं लागलं. किती हे दुर्दैव.
Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अ‍ॅक्टिव मोडमध्ये

Ganpatrao Deshmukh: आम्हाला 500 रुपये दिले म्हणून आम्ही आलो, गणपतराव देशमुख यांच्या पत्नीचा गंभीर आरोप|VIDEO

Pune: भावकीच्या वादातून तुंबळ हाणामारी, एकमेकांवर कोयत्याने सपासप वार; तिघे गंभीर जखमी; थरारक VIDEO

Maharashtra Politics : पुण्यात काँग्रेसला बसणार धक्का, ५ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

Mumbai Metro: मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पुढचे ७ दिवस या मार्गांवरील वेळापत्रकात बदल

SCROLL FOR NEXT