Female student of Mahatma Phule Vidyalaya ended her life  Saam TV News
महाराष्ट्र

Amravati News : विहिरीत उडी घेऊन विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, शाळेच्या आवारातच टोकाचं पाऊल

Amravati Varud Female Student Commits Suicide : आत्महत्येची घटना सायंकाळी ५ वाजता उघडकीस आल्यानंतर तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Prashant Patil

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वरुड येथील एका विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. अंकिता शेंडे (रा. लिंगा) असं विद्यार्थिनीचं नाव आहे. ती महात्मा फुले विद्यालय येथे शिक्षण घेत होती. हांडेवाडीतील वस्तीगृहात ती राहत होती. पटेल ले-आउटमधील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केलीय.

आत्महत्येची घटना सायंकाळी ५ वाजता उघडकीस आल्यानंतर तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या संदर्भातील उत्तरीय तपासणी सध्या वरुड पोलीस करत आहेत.

दरम्यान, राज्यात मागील वर्षात २ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या काळात विदर्भ आणि मराठवाड्यातील २,७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. विधान परिषदेत आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरींसह इतर सदस्यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत प्रश्न केला होता. त्या प्रश्नाला उत्तर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) यांनी दिलं.

मंत्री पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,अमरावती विभागामध्ये १,०६९ आणि छत्रपती संभाजीनगर विभागात ९५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. हवामान बदल, ओला, कोरडा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे आत्महत्या केल्या असल्याची माहिती मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT