ganesh idol 
महाराष्ट्र

पाेलिस ठाण्यात झिंगाट डान्स; व्हिडिओ व्हायरल झाला ना भाऊ!

अरुण जोशी

अमरावती : सैराट चित्रपटातील झिंगाट गाण लागले अन् तुमचे पाय थिरकणार नाहीत असे हाेणारच नाही. अमरावती पाेलिसांबाबत देखील नेमके हेच झाले. पाेलिस ठाण्यातील बाप्पाच्या विसर्जनासाठी निघालेल्या पाेलिस कर्मचा-यांच्या कानावर झिंग झिंग झिंगाटचे सूर पडले आणि सर्व उपस्थित पाेलिस कर्मचारी डाेलू लागले. पाेलिसांच्या नृत्याचा व्हिडिआे जिल्ह्यात कमालीचा व्हायरल हाेऊ लागला असून सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांनी हम करे साे कायदा अशा पाेलिसांच्या कृत्यावर भावना व्यक्त केली आहे. amravati-police-dance-video-viral-ganesh-visarjan-trending-news-sml80

अमरावती amravati जिल्ह्यात बाप्पाला ganeshotsav 2021 निरोप देताना सार्वजनिक गणेश मंडळांना अतिशय साध्या पद्धतीने निरोप देण्याचे आदेश पाेलिसांनी दिले होते. कोणत्याही मंडळाला डिजे किंवा ध्वनी यंत्रणा लावण्याची परवानगी दिली नाही. मात्र ज्या पाेलिस खात्याने मंडळांना ध्वनी यंत्रणा लावण्याची परवानगी नाकारली त्याच पाेलिस दलातील कर्मचा-यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला झिंगाटवर ताल धरत निराेप दिला.

गणेशाेत्सव काळात सर्वत्र गणपतीची ganesh idol आराधना केली जाते. बुहुतांश शासकीय, निमशासकीय कार्यालयात देखील गणपती बसविला जाताे. पोलिस ठाण्यात देखील बाप्पांची मनाेभावे पूजा केली जाते. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना त्याची धुमधडाक्यात मिरवणुक काढण्याची भाविकांची इच्छा असते. काेविड १९ मुळे यंदा देखील प्रशासनाने मिरवणुकांवर बंदी घातली. त्यामळे ना वाद्य , ना ध्वनी यंत्रणा. साध्या पद्धतीने अमरावतीकरांनी बाप्पास निराेप दिला. दूसरीकडे मात्र पाेलिस ठाण्यातील बाप्पास निराेप देताना कर्मचारी झिंगाटच्या गाण्यावर थिरकताना दिसले.

दरम्यान पाेलिसांच्या नृृत्याचा व्हिडिआे सध्या गणेश भक्त एकमेकांना पाठवत आहेत. सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांना मिरवणुक काढण्यासाठी परवानगी नाकारली. केवळ हाताच्या बाेटावर माेजण्या इतपत कार्यकर्त्यांना विसर्जन करण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली. पोलिस दलाने मात्र ध्वनी यंत्रणा लावून नृत्य केले. त्यांनी मास्कचा देखील वापर केला नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना नियम नाहीत का असा प्रश्न समाज माध्यमांवर उपस्थित करीत गणेश भक्तांनी कारवाईची मागणी केली आहे. edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT