Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : शिवपुराण कथेच्या कलश यात्रेदरम्यान महिलेचा मृत्यू

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात आजपासून सुरु होणार्‍या पं. प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात आयोजित आहे. या (Amravati) कथा निमित्ताने परतवाडा येथे आज सकाळी कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत सहभागी महिलेचा अचानक (Death) मृत्यू झाल्याची घटना घडली.  

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा (Paratwada) शहरात आजपासून सुरु होणार्‍या पं. प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने परतवाडा शहरातून कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेला प्रचंड महिलांचा उत्साह पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कलश यात्रा जात असताना यात सहभागी एका महिलेला हृदयविकाराचा झटका आला व त्या महिलेचा मृत्यू झाला. ललिता सुभाषराव बाळापुरे (वय ५८) असे मृत झालेल्या महिलेचं नाव आहे. 

इतर महिल्यांप्रमाणे ललिता या सुद्धा या कलश यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या. या यात्रेमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होती. यात्रा पुढे जात असतांना ललिता त्यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यांची तब्येत अचानक खालावली. आयोजकांनी ललिता बाळापुरे यांना लगेच रुग्णवाहिकेद्वारा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या शिवमहापुराण कथेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान आयोजकांनी अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; मुलाने दिली निधनाची बातमी, सिनेविश्वाला मोठा धक्का

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेट आजचे दर

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- रायगडचा पालकमंत्री कोणाला करायचं हे तिन्ही नेते एकत्र बसून लवकर निर्णय घेतील- चंद्रशेखर बावनकुळे

Fashion Tips : या कारणामुळेच काही कपडे घातल्यावर चेहरा उजळतो आणि काहींमध्ये डल दिसतो!

LPG Cylinder Price: ग्राहकांना आता मिळणार १० किलोचा सिलिंडर; डिलीव्हरीही होईल झटपट, जाणून घ्या किती असेल किंमत?

SCROLL FOR NEXT