Amravati Police Action  Saam Tv
महाराष्ट्र

Amravati News: २ कोटींची रोकड घेऊन जाणारी वाहनं जप्त, अमरावती पोलिसांची मोठी कारवाई

Amravati Police Action : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. यादरम्यान कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत मोठी रक्कम जप्त केली आहेत. आ

Priya More

अमर घटारे, अमरावती

अमरावतीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रोकड वाहतूक करणारी दोन वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत. या वाहनांमध्ये तब्बल अडीच कोटींची रोख रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 'रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्विस' या कंपनीची कॅश वाहतूक करणारी वाहनं असल्याची माहिती समोर आली आहे. सिटी कोतवाली पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. यादरम्यान कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत मोठी रक्कम जप्त केली आहेत. आता पोलिसांनी अमरावतीमध्ये देखील कारवाई केली आहे. पोलिसांनी रोकड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. सध्या पोलिसांकडून पैशांची वाहतूक करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, जालन्यामध्ये देखील पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपयांची रक्कम जप्त केली होती. जालन्यातील वाघरुळ येथे एसएसटी पथकाने एका चारचाकी वाहनातून ३ लाख ८२ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. जालना ते देऊळगाव राजा रोडवरील वाघरुळ येथे एका चार चाकी वाहनातून ही रक्कम नेण्यात येत होती. पथकाने या रकमेबाबत वाहन चालकाला विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी ही रक्कम जप्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara : वाहतूक निरीक्षक शाहरूख खानला उद्धटपणा भोवला; एसटी महामंडळाची मोठी कारवाई

Pune Tourism : सुट्टीमध्ये करा पुणेकरांच्या आवडत्या वीकेंड डेस्टिनेशनची सफर, 'हे' ठिकाण पावसाळ्यात मन मोहून टाकते

Brain Tumor Symptom: हे 1 सायलेंट लक्षण दिसलं तर समजा मेंदूमध्य तयार होतोय ट्यूमर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या नांदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

Tuesday Horoscope : रोमॅंटिक दिवस जाईल, ५ राशींचे भाग्य उजळणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT