Two Tigers Fight in Melghat Saam TV
महाराष्ट्र

Two Tigers Fight in Melghat: सांबराच्या शिकारीसाठी दोन वाघ भिडले; झुंजीत एका वाघाचा जागीच मृत्यू

Melghat Tigers Fight: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैराट जंगलात सांभाराची शिकार केल्यानंतर दोन वाघांची झुंज झाली. या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे, साम टीव्ही

Two Tigers Fight in Melghat: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैराट जंगलात सांभाराची शिकार केल्यानंतर दोन वाघांची झुंज झाली. या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला आहे. याची माहिती वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर मृत वाघाच्या मानेवर दाताच्या खुणा आढळून आल्या. (Latest Marathi News)

या खुणा ओळखून झुंज झाली असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. मागील काही वर्षांपासून मेळघाटात वाघांचा मुक्त संचार होत आहे. वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशातच मेळघाटात वाघांमध्ये झुंज होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे.

२९ एप्रिलला मेळघाटात कर्मचारी गस्तीवर असताना वैराट वर्तुळमधील पचंबा बिट ३४ वनखंड क्रमांकमध्ये वाघ त्यांना वाघ मृत अवस्थेत आढळून आला. गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. (Breaking Marathi News)

घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा सुमंत सोळंके, इंद्रजीत निकम सहाय्यक वनसंरक्षक, डॉ. मयुर भैलुमे वनपरिक्षेत्र अधिकारी चिखलदरा यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी अधिकाऱ्यांनी मृत वाघाच्या (Tiger) शरीराची पाहणी केली असता, त्याच्या मानेवर दातांच्या आणि अंगावर पंजांच्या खुणा दिसून आल्या. डॉ. धांदर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणी अहवालानुसार आणि पाहणी दरम्यान वाघाचे सर्व अवयव जसे की सर्व दात, सर्व नखे, वाघाच्या मिश्या आणि इतर अवयव जागेवर होते.

त्यावरून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणीनुसार प्रथम दर्शनी दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यु झाल्याचे दिसून येते. याबाबत अधिकचा तपास सुरू आहे. आसपासच्या सर्व क्षेत्राची पाहणी करून पाणवठे तपासणी करून सदर जागेवर कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT