Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : आठ दिवसांपासून शेतात वीज नाही; वीज कार्यालयावर ठिय्या आंदोलन

Amravati News : आठ दिवसांपासून शेतात वीज नाही; वीज कार्यालयावर ठिय्या आंदोलन

Rajesh Sonwane

अमर घटारे  
अमरावती
: यंदा उशिराने पावसाचे आगमन झाले असून हवा तसा पाऊस झाला नाही. यामुळे पिकांची (Amravati) अपेक्षित वाढ झाली नाही. यात आता पाऊस नसल्याने पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. परंतु शेतात वीजपुरवठा नसल्याने शेतकरी (Farmer) आक्रमक झाले असून महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. (Latest Marathi News)

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक करपत आहे. यात अमरावती जिल्ह्यतील अंजनगाव सुर्जी लगत कापूस तळणी भागात गेल्या तीन दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा (Mahavitaran) पूर्णपणे बंद आहे. शेतातील विहिरीत पाणी आहे. मात्र वीज पुरवठा नसल्याने शेतातील पीक हे शेतकरी वाचवू शकत नाही. परिणामी शेतकरी त्रस्त झाला आहे. 

शेतकऱ्यांचा ठिय्या 

आठ तास वीज पुरवठा सुरू असला पाहिजे; असे आदेश असताना सुद्धा गेल्या तीन दिवसापासून वीज पुरवठा बंद असल्याने अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत मंगळे यांच्या नेतृत्वात कापूस तळणी वीज मंडळ कार्यालयात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांना बोलविल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT