Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : दर्यापुरात रण पेटलं; नवनीत राणा-अडसूळ यांच्यात जोरदार जुंपली

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदार संघात निवडणुकीपूर्वी रण पेटल्याचे दिसू लागले आहे. या जागेवरून नवनीत राणा व शिवसेना शिंदे गटाचे अभिजित अडसूळ यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यात अडसूळ यांनी एकदा गप्प बसलो, पण आता गप्प बसणार नाही; असे म्हणत महायुतीसह राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.   

अमरावतीच्या (Amravati News) दर्यापुरामध्ये शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अडसूळ यांनी बोलताना महायुतीवर निशाणा साधला आहे. त्यांनी सांगितले, कि अमित शहांच्या सांगण्यावरून अमरावती लोकसभेची जागा भाजपला सोडली आणि आपला घात झाला. आपल्या हातून ही जागा गेली. सुरवातीपासून आम्ही सांगत होतो लोकांचा विरोध आहे, ही जागा निवडून येणार नाही असेही अभिजीत अडसूळ म्हणाले.

आता गप्प बसणार नाही 

दर्यापूरची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे. तरी देखील काही लोक इथे अडचणी निर्माण करताहेत. एकदा आम्ही गप्प बसलो आता गप्प बसणार नाही; असा थेट इशारा (Shiv Sena) शिवसेना नेते तथा दर्यापूरचे माजी आमदार अभीजीत अडसूळ यांनी महायुतीसह राणा दाम्पत्याला अप्रत्यक्षरीत्या दिला आहे. 

भाजपचा उमेदवार निवडणूक लढविणार : राणा 

तर माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी देखील दर्यापूर विधानसभेच्या जागेवर बोलताना दर्यापूर मतदार संघात अमरावती जिल्ह्यातील उमेदवार आम्हाला दर्यापूरमध्ये पाहिजे. बाहेरचे पार्सल चालणार नाही; असे म्हणत अप्रत्यक्षपणे अभिजीत अडसूळ यांच्यावर टीका केली आहे. तसेच दर्यापूर विधानसभेत देखील भाजपचा उमेदवार निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीत भाजपला मतदारसंघ सुटावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नंदूरबारमध्ये बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; प्रवाशांसह बस चालक गंभीर जखमी

Arundhati Reddy: पाकिस्तानविरुद्ध ही चूक करणं महागात पडलं! भारताच्या स्टार खेळाडूवर ICC ची मोठी कारवाई

Nobel Prize In Physiology : अॅम्ब्रोस-गॅरी रवकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार; संशोधन आणि पुरस्काराची रक्कम किती?

Maharashtra Politics : सुनेत्रा पवारांच्या पराभवामागे 'अदृश्य' हात; जावयाचा अजितदादांना 'गोलीगत' धोका

Diabetes risk : समोसा,भजी, वेफर्स खाताय? सावधान; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT