Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Navneet Rana : तुम्हीही राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक लढवा; नवनीत राणा यांचे अमरावतीच्या खासदारांना आव्हान

Amravati News : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निकालानंतर महाविकास आघाडी कडून ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचे सांगत आक्षेप घेतला जात आहे.

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : महाविकास आघाडी आता ईव्हीएमवर आक्षेप घेत आहे. असे असेल तर अमरावतीच्या खासदारांनी देखील राजीनामा द्यावा आणि आमदार रवी राणा हे देखील राजीनामा देतील. यानंतर होऊन जाऊ द्या एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक; असे आव्हान माजी खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे याना केले आहे. 

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निकालानंतर महाविकास आघाडी कडून ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचे सांगत आक्षेप घेतला जात आहे. यावर माजी खासदार नवनीत राणा यांनी बळवंत वानखेडे यांच्यावर टीका करत खासदारकीचा राजीनामा देण्याचे आव्हान केले आहे.   

नवनीत राणा म्हणाल्या, कि लोकसभामध्ये जास्त जागा निवडून आल्या. तेव्हा ईव्हीएम बरोबर होती आणि लोकशाही जिवंत होती. पण आम्ही संविधानाला मानतो. यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही आक्षेप घेण्यासाठी बाहेर निघालो नाही. मात्र विधानसभेत पराभव झाल्याने महाविकास आघाडीकडून आता लोकशाही जिवंत नसल्याचे म्हटले जात असून ईव्हीएममध्ये देखील आक्षेप घेतला जात आहे. 

पण आता त्यांना आव्हान आहे, कि अमरावतीच्या खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. तसेच विधानसभेत निवडणूक आलेले आमदार रवी राणा हे देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील. या दोन्ही निवडणूक देखील बॅलेट पेपर वर करा; अशा शब्दात नवनीत राणा यांनी खासदार वानखेडे यांना आव्हान दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: कॅबमधील इमर्जन्सी बटन खरंच काम करतंय का? ड्रायव्हरने दिलेल्या उत्तराने बसेल धक्का, VIDEO चर्चेत

Ambernath Crime : अंबरनाथमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; मध्यरात्री धाड टाकून ५ जणांना अटक

Maharashtra Live News Update: रोहित पवार मारिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात; DGCA च्या विरोधात तक्रार दाखल

Mangalsutra Important: लग्नानंतर महिलांच्या गळ्यात मंगळसूत्र का असते?

Chandra Grahan 2026: चंद्र ग्रहणाच्या वेळी या गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ; आयुष्यातील अडचणींपासून मिळेल मुक्ती

SCROLL FOR NEXT