Navneet Rana Vs Imtiaz Jaleel  Saam TV
महाराष्ट्र

Navneet Rana News: इम्तियाज जलील यांच्या 'त्या' विधानावर खासदार नवनीत राणा भडकल्या; थेट ओपन चॅलेंजच दिलं

Amravati Latest News: अमरावतीत येऊन नवीन राणा यांना लोकसभा निवडणुकीत पाडून दाखवू, असं विधान खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं.

Satish Daud

Navneet Rana Vs Imtiaz Jaleel

अमरावतीत येऊन नवीन राणा यांना लोकसभा निवडणुकीत पाडून दाखवू, असं विधान खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा खासदार नवनवनीत राणा यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तुमच्यासारखे ५६ आले आणि गेले, पण मी घाबरत नाही, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिंमत असेल तर, माझ्याविरोधात अमरावतीतून निवडणूक लढवावी आणि माझा पराभव करून दाखवावा, असं ओपन चॅलेंज नवनीत राणा यांनी जलील यांना दिलं. त्या अमरावतीमधील एका कार्यक्रमात बोलत होत्या. 'या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल', असा पुनरुर्चार देखील राणा यांनी केला.

या देशातील लोकांनी अनेक पिढ्यानपिढ्या राम मंदिर उभारण्याची वाट पाहिली. तुमच्यासारखे अनेकजण येऊन गेले. पण अयोध्येत राम मंदिर उभारून दाखवलं, अशी टीकाही नवनीत राणा यांनी खासदार जलील यांच्यावर केली. (Latest Marathi News)

ओवेसी यांच्याबद्दल एक शब्द देखील बोलल्यास ते व्याजासह अमरावतीमध्ये आणि तुझ्या घरी येऊन परतफेड करेल, अशा इशारा ओवेसी यांनी दिला होता. या इशाऱ्याचा देखील राणा यांनी खरपूस समाचार घेतला आहे. हिंमत असेल तर अमरावतीत येऊन दाखवा मी साडीचा पदर खोचून उभी आहे, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

तुमच्यात जर हिंमत असेल, तर अमरावतीत येऊन माझ्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवा आणि मला पाडून दाखवा. जर नाही लढवल्यास तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधून कसे निवडून येता हे मी पाहतेच, असं ओपन चॅलेंज देखील नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT