Amravati News
Amravati News Saam Digital
महाराष्ट्र

Amravati News: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू, अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amravati News

अमरावतीत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सकाळी ६ च्या सुमारास ही घटना अमरावती चांदूर रेल्वे मार्गावरील एसआरपीएफनजीक घडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मृत बिबट्याला बांबू गार्डन परिसरात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले आहे.

अमरावती चांदूर मार्गावर मोठा जंगल असून या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्याचा वावर आहे. त्यामुळे या रस्त्याने जाताना वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. अलिकडे बिबट्यांच्या मृत्यूसाठी शिकार, जंगलतोडीसह आणखी एक कारण समोर आलं आहे. जंगल भागातून गेलेल्या रस्त्यांवर भरधाव वाहनांचा मोठा धोका या प्राण्यांना निर्माण झाला असून यामध्ये रेल्वेचाही समावेश आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अलिकडे देशभरात दळणवळणाच्या सुविधा प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. यातून निर्माण झालेले रस्ते, लोहमार्ग, वीज वाहिन्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागातून जातात. त्यामुळे बिबट्यासह वन्य प्राण्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यात वाहनांच्या धडकेत मृत्यू झालेल्या बिबट्यांची संख्या मोठी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atishi Marlena: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण भाजपचं षडयंत्र; आप नेत्या आतिशींचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: अवैध होर्डिंगवर कारवाईचे आदेश; सरकारकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

PM Kisan Yojana: निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांसाठी खुशखबर; लवकरच खात्यात जमा होणार २००० रुपये

Tendli Sabzi Benefits : 'ही' १० रुपयांची भाजी अनेक आजारांवर गुणकारी; डायबिटीजपासून किडनीपर्यंत सर्व आजार छुमंतर

Tea Time: दिवसातून किती वेळा चहा- कॉफी प्यावी?

SCROLL FOR NEXT