Bacchu Kadu News : राज्यात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार स्थापन होऊन जवळपास ४ महिन्यांचा कालावधी उलटला, तरी देखील मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा अजूनही पार पडलेला नाही. पहिल्या टप्प्यात मंत्रीपदापासून वंचित राहिलेले अनेक आमदार मंत्रीमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्याची आतुरतेने वाट पाहत आहे. (Bacchu Kadu News Today)
अशातच अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मंत्रीपदावरून एक मोठं विधान केलंय. मंत्रिमंडळात विस्तारावर बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता, 'मी काय प्रमुख आहे का? शिंदे गट आणि भाजपमध्ये आमचा प्रहार पक्ष लहानसा पक्ष आहे', असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)
आमदार बच्चू कडू हे आज अमरावती येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी बच्चू कडूंना मंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला, यावर 'मी आता मंत्री होईल नाही तर अडीच वर्षानंतर मंत्रीपद मिळेल, असं उत्तरही बच्चू कडू यांनी दिलं'. बच्चू कडू यांच्या या विधानानंतर ते पुन्हा नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra News)
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मीडियावरच आगपाखड
अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चक्क बच्चू कडू यांनी मीडियावरच आगपाखड केली.
शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. चला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दाखवतो, तुम्ही माहिती घेत नाही, संशोधन केलं पाहिजे. किती जणांच्या खात्यात पैसे आले ते तुम्हाला दाखवून देतो, असं बच्चू कडू म्हणाले.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.