Shivsena : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक; ठाकरे गटाकडून आणखी एका नावाची चर्चा

लटके यांचे निकटवर्तीय उपविभाग प्रमुख अनिल खांडेकर यांनाही पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Andheri By-Election
Andheri By-ElectionSaam TV
Published On

Andheri By-Election : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी द्यायचं निश्चित केलं आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा समोर आल्याने आता ठाकरे गटाने (Shivsena) मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर लटकेंची उमेदवारी निश्चित होणार आहे. (Mumbai News Today)

Andheri By-Election
Shivsena: आमच्या पक्षासोबत भेदभाव तर शिंदे गटाला प्राधान्य; उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला 4 पानांचं खरमरीत पत्र

दरम्यान, लटके यांची उमेदवारी अडचणीत आल्यास ठाकरे गटाकडून प्लॅन बी तयार असल्याचं बोललं जातंय. त्यासाठी या नावांमध्ये माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, प्रमोद सावंत आणि कमलेश राय ही तीन नावं निश्चित करण्यात आली आहे. आता या नावांमध्ये आणखी एका नावाची भर पडलीय. (Latest Marathi News)

लटके यांचे निकटवर्तीय उपविभाग प्रमुख अनिल खांडेकर यांनाही पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतीच ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याची बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

रमेश लटके यांच्या कुटुंबातील सदस्य वगळून चर्चेत असलेल्या तिन्ही पैकी एकाला उमेदवारी मिळाली तर शिवसेनेला मत पेटीत फटका बसू शकतो. यामुळे शिवसेना ऋतुजा लटके यांच्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, तसं झालं नाही तर हा प्लॅन बी तयार करण्यात आला आहे. (Maharashtra News)

शिवाय दिवंगत आमदार रमेश लटके यांचे बंधू सुरेश लटके यांना देखील उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने अद्यापही ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. याविरोधात आता ऋतुजा लटके यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. थोड्याच वेळात त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार असून न्यायालय काय निर्णय देतं याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com