Shivsena: आमच्या पक्षासोबत भेदभाव तर शिंदे गटाला प्राधान्य; उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला 4 पानांचं खरमरीत पत्र

Shivsena Latest News: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आमच्या पक्षाला (ठाकरे गटाला) सापत्य वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
Uddhav Thackeray Latest To ECI
Uddhav Thackeray Latest To ECISaam TV
Published On

शिवाजी काळे, नवी दिल्ली

Uddhav Thackeray Latest News: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला चार पानांचं खरमरीत पत्र लिहीलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आमच्या पक्षाला (ठाकरे गटाला) सापत्य वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. (Shivsena Latest News)

Uddhav Thackeray Latest To ECI
Hijab Case Hearing: हिजाब वादावर दोन्ही न्यायाधीशांमध्ये एकमत नाहीच; प्रकरण घटनापीठाकडे वर्ग

सर्वोच्च न्यायालयातील वकील अॅडव्होकेट विवेक सिंह यांनी उद्धव ठाकरेंच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला हे चार पानांचं पत्र लिहीलं आहे. या पत्रात उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून एकूण १२ मुद्दे मांडण्यात आले आहेत. या पत्रात उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रात म्हटलं गेलंय की, केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या पक्षाला (ठाकरे गटाला) सापत्य वागणूक देत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या पक्षासोबत भेदभाव करीत आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय निवडणूक आयोग प्रतिवादी एकनाथ शिंदे गटाला प्राधान्य देत असल्याचा आरोपही या पत्राद्वारे करण्यात आला आहे. शिंदे गट निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर देखील कागदपत्र देत नाही. मात्र, आम्ही दिलेली कागदपत्रं शिंदे गटाला दिली जातात आणि पण त्यांची कागदपत्रे आम्हाला दिली जात नाही असाही आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जो पक्ष निवडणूक लढवीत नाही तरी पण त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह रद्द केले जाते असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.

Uddhav Thackeray Latest To ECI
Sangli Rain: भाळवणी पूल पाण्याखाली; वाहतुकदारांनाे ! 'या' मार्गाचा वापर करा, विटा प्रशासनाचं आवाहन

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आण चिन्ह दिलं आहे. तसेच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल-तलवार हे चिन्ह दिलं आहे. त्याचप्रमाणे 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव एकनाथ शिंदेंच्या गटाला, तर उद्धव ठाकरेंच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com