Amravati News BJP Nitish Rane Criticizes Shiv sena Uddhav Thackeray love jihad Maharashtra Politics  Saam TV
महाराष्ट्र

Nitish Rane on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं धर्मांतर झालंय, लव्ह जिहाद झालाय; नितेश राणेंची जीभ घसरली

Nitish Rane News: उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजप आमदार नितेश राणे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे, साम टीव्ही

Nitish Rane Criticizes Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजप आमदार नितेश राणे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. उद्धव ठाकरे यांचं धर्मांतर झालं आहे. त्यांचा लव्ह जिहाद झाला आहे. ते आता हिंदू राहिले नाही, एकनाथ शिंदे यांचं प्रखर हिंदुत्व आहे, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली आहे.  (Latest Marathi News)

उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा

इतकंच नाही तर, महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या दंगली घडत आहेत. त्यामध्ये  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांचा हात असण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे यांनाच दंगली हव्या होत्या. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करा, असं देखील नितेश राणे यांनी म्हटलं आहे. आमदार नितेश राणे अमरावती दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

काय म्हणाले नितेश राणे?

उद्धव ठाकरे यांचं धर्मांतर झालं आहे. लव्ह जिहाद झाला आहे. २०१९ मध्ये खुर्ची देताना त्यांचा सुंता करून टाकला आहे. धर्मांतर करून टाकलं आहे. ते आता हिंदू राहिले नाहीत. त्यामुळे ते हिंदुत्वावर कसे बोलणार? एकनाथ शिंदे यांचं प्रखर हिंदुत्व आहे, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली आहे. (Maharashtra Political News)

'ठाकरेंना महाविकास आघाडीत मान नाही'

बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांना मानसन्मान द्यायचे. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून त्यांना भाजपचे सर्व नेते मान द्यायचे. त्यावेळी आमचे नेते मातोश्रीवर जायचे. त्यांनी खुर्चीवर बसवायचे. हा मानसन्मान उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये नाही, असंही नितेश राणे (Nitish Rane) म्हणाले.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना खुर्चीच्या ऐवजी बाजूला सोप्यावर बसवलं जात आहे. आता सोप्यावर आणलं आहे. सिल्वर ओकवरील पुढच्या बैठकीत उद्धव ठाकरे तुम्हाला स्टुलवर दिसतील, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT