amravati news
amravati news  saam tv
महाराष्ट्र

Breaking News : अमरावतीत १५ वर्षीय मुलाच्या चेहऱ्यात बाण घुसला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati News : अमरावती जिल्ह्यातून धक्कादायक वृत्त समोर येत आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील शासकीय क्रीडांगण परिसरात पंधरा वर्षातील मुलाच्या चेहऱ्यात बाण घुसल्याची घटना घडली आहे. वेदांत गणेशराव डहाले असे जखमी मुलाचे नाव आहे. वेदांतवर दर्यापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीत शासकीय क्रीडांगण परिसरात पंधरा वर्षातील मुलाच्या चेहऱ्यात घुसला बाण घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात ही घटना घडली आहे. वेदांत गणेशराव डहाले असे जखमी मुलाचे नाव आहे.

अमरावतीमधील दर्यापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शासकीय क्रीडा परिसरात विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू असताना वेदांतच्या चेहऱ्यात बाण घुसला. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

रुग्णालयात दाखल केलेल्या वेदांतची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच मुलाच्या चेहऱ्यातील बाण काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. क्रीडांगण परिसरात क्रीडा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

SCROLL FOR NEXT