Abhijit Adsul Saam tv
महाराष्ट्र

Abhijit Adsul : नवनीत राणांच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट उशीर का करतेय?; अभिजित अडसूळ यांचा सवाल

Amravati News : अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधताना माजी आमदार अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rajesh Sonwane

 

अमर घटारे 

अमरावती : नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र संदर्भात २० फेब्रुवारीला सुनावणी आहे. हाय कोर्टाने निकाल देत (Navneet Rana) नवनीत राणा यांचे १४ प्रमाणपत्र हे बोगस आहे. सुप्रीम कोर्टात मात्र २० महिन्यापासून त्यांचे प्रकरण प्रलंबित आहे. मुळात सुप्रीम कोर्टाकडून नवनीत राणा यांच्या निर्णयाबाबत उशीर (Amravati) का केला जात आहे? असा सवाल (Shivsena) शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे.  (Breaking Marathi News)

अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधताना माजी आमदार अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कि एकीकडे सुप्रीम कोर्ट आदेश देत आहे की १६ आमदारांचा निकाल तीन महिन्यात घेण्यात यावा. दुसरीकडे नवनीत राणांच्या प्रकरणाला सुप्रीम कोर्ट २०-२० महिने लावत आहे. मलाही प्रश्न पडला आहे की सुप्रीम कोर्ट नेमकं कोणाच्या विचारावर चालत आहे; असा सवाल देखील उपस्थित केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंडिया आघाडीत शेवटी काँग्रेसचं उरेल 

इंडिया आघाडीमधील जेवढे काही पक्ष आहे, ते मनातल्या मनात एक दिवसासाठी पंतप्रधान होत आहे. कुठेतरी वाटले कि आपले नाव मागे पडत आहे; त्यावेळी त्या पक्षाचे नेते बाहेर पडत आहे. असे करत हळुहळू सर्व पक्ष बाहेर पडतील आणि शेवटी फक्त काँग्रेस उरेल; असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

Mithila Palkar: गोड गोजिरी, लाज लाजिरी.... अभिनेत्रीच्या सौंदर्याने केलं घायाळ

Paranda Fort History: दारूगोळ्याचे भांडार अन् स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना, परंडा किल्ल्याचा इतिहास वाचा

SCROLL FOR NEXT