Amravati News A young man killed his brother over Team India defeat in Icc World Cup 2023 final  Saam TV
महाराष्ट्र

Amravati News: तुम्ही मटण खाऊन आले म्हणून भारत मॅच हरला; तरुणाचा वडिलांवर हल्ला, मारहाणीत भावाचा मृत्यू

Amravati Crime News: मटन खाऊन आल्यामुळे भारत हरला असे म्हणत एकाने आपल्या लहान भावावर आणि वाडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केला असून यात लहान भावाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.

Satish Daud

अमर घटारे, साम टीव्ही

Amravati Crime News

मटन खाऊन आल्यामुळे भारत हरला असे म्हणत एकाने आपल्या लहान भावावर आणि वाडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केला असून यात लहान भावाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना अमरावती जवळील अंजनगाव बारी गावात घटना घडली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंकित इंगोले (वय २८ वर्ष) असं हत्या झालेल्या लहान भावाचे नाव आहे. तर रमेश इंगोले असं गंभीर जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण इंगोले (वय ३२ वर्ष) याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनलचा सामना सुरू होता. आरोपी प्रवीण त्याचा अंकित भाऊ आणि रमेश तिघेही टीव्हीसमोर बसून मॅच पाहत होते. दरम्यान, आरोपीचे वडील आणि लहान भावाने रात्रीच्या जेवणात मटन खाल्ले.

जेवणानंतर ते हॉलमध्ये आले असता, आरोपी प्रवीणने त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तुम्ही मटण खाऊन टीव्हीजवळ आले म्हणून भारत मॅच हरला, असं म्हणत आरोपीने वडिलांवर लोखंडी रॉडने हल्ला केला. वडिलांना वाचविण्यासाठी आरोपीचा लहान भाऊ अंकित मध्यस्थी आला.

तेव्हा आरोपीने त्याला देखील लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत अंकितचा जागीच मृत्यू झाला. तर वडील रमेश गंभीर जखमी झाले. दरम्यान, घरात सुरू असलेली आरडाओरड पाहून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी आरोपी प्रवीणला पकडून ठेवले आणि त्याच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केले. आरोपीच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असून अंकितचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी प्रवीणला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT