Pune Crime News: धक्कादायक! येरवडा कारागृहातून कुख्यात गुंडाने ठोकली धूम; पुणे पोलिस दलात खळबळ

Pune Yerawada Jail News: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा कारागृहातून एका कुख्यात गुंडांने धूम ठोकली आहे.
Shocking news Gangster Ashish Jadhav escapes from Yerawada Jail Investigation started by Pune Police
Shocking news Gangster Ashish Jadhav escapes from Yerawada Jail Investigation started by Pune PoliceSaam TV
Published On

Pune Yerawada Jail Latest News

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा कारागृहातून एका कुख्यात गुंडांने धूम ठोकली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा गुंड कधी पळाला, याचे उत्तर कारागृह प्रशासनाकडे नाहीये. सोमवारी दुपारी कारागृह अधिकाऱ्यांनी जेव्हा तुरुंगातील कैद्यांची मोजणी केली, तेव्हा हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shocking news Gangster Ashish Jadhav escapes from Yerawada Jail Investigation started by Pune Police
Mumbai News: PM मोदींसह CM योगींना बॉम्बने उडवून देऊ; मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, आरोपी गजाआड

आशिष जाधव, असं कारागृहातून फरार झालेल्या गुंडाचं नाव आहे. पुण्यातील (Pune News) वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २००८ साली एका व्यक्तीची हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी जाधव याला अटक केली होती.

तेव्हापासून तो तुरुंगात शिक्षा भोगत होता. आरोपी जाधवची तुरुंगातील वागणूक पाहता, त्याला येरवडा कारागृह प्रशासनाने (Yerawada Jail) रेशन विभागात काम करण्यासाठी नियुक्त केलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास अधिकाऱ्यांनी जेव्हा तुरुंगातील कैद्यांची मोजणी केली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. अधिकाऱ्यांना आरोपी आशिष जाधव कुठेही दिसून आला नाही. शोधाशोध घेत तुरुंगातील इतर कैद्यांना आरोपीबाबत विचारलं असता, आम्हाला तो कुठे गेला याबद्दल काहीच माहिती नाही, असं कैद्यांनी पोलिसांना सांगितलं.

येरवडा तुरुंगात कडक पहारा असताना देखील आरोपी पळून कसा गेला? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून आरोपीच्या शोधात पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत.

Shocking news Gangster Ashish Jadhav escapes from Yerawada Jail Investigation started by Pune Police
Police Officers Transfer: राज्याच्या पोलिस खात्यात मोठी खांदेपालट; तब्बल १९ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com