Amravati News 8 month pregnant lady police constable death bike accident Saam TV
महाराष्ट्र

Amravati Accident: मद्यधुंद दुचाकीस्वाराची पोलिसांच्या दुचाकीला धडक; ८ महिन्यांच्या गर्भवती पोलिसाचा मृत्यू

Woman Police Death: ड्युटी संपवून घरी जात असताना महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली.

Satish Daud

अमर घटारे, साम टीव्ही

Amravati Pregnant Woman Police Death

ड्युटी संपवून घरी जात असताना महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत गर्भवती महिला पोलीसाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना अमरावती शहरात शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.  (Latest Marathi News)

प्रियंका बोरकर (वय 26 वर्ष रा.अमरावती) असं मृत महिला पोलीस कॉन्स्टेबलचं (Police) नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकी चालक गौरव मोहोड याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका बोरकर या ग्रामीण पोलिसाच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. त्या ८ महिन्यांच्या गर्भवती होत्या.

शनिवारी रात्री दोनच्या सुमारास प्रियंका ड्युटी संपवून आपल्या पतीसोबत दुचाकीवरुन जातहोत्या. शहरातील गाडगे नगर मंदिरात त्यांची दुचाकील आली असता, पाठीमागून मद्यधुंद दुचाकीस्वार आला, त्याने प्रियंका यांच्या दुचाकीला जोरदार धडक (Accident) दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की प्रियंका यांच्या डोक्याला मार लागला. अपघातात त्यांच्या पतीला देखील दुखापत झाली. दरम्यान, दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना प्रियंका यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद दुचाकीस्वार गौरव मोहोड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे. प्रियंका यांची कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ओळख होती. ८ महिन्यांच्या गर्भवती असताना देखील त्या ड्युटी करत होत्या. त्यांच्या मृत्युने पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkuwa News : प्रसूतीसाठी झोळीत टाकून पायपीट; रस्त्याअभावी रुग्णालयात पोहचणे अशक्य, माघारी फिरत घरीच प्रसूती

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

SCROLL FOR NEXT