Amravati News  Saam tv
महाराष्ट्र

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Amravati News : नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात आले आहेत. तर शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली असून मात्र प्रत्यक्षात अनेकांना मदत मिळाली नसल्याचे चित्र

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून या शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर करत दिवाळीपूर्वी हि मदत देण्याचे जाहीर केले होते. मात्र दिवाळी येऊन गेली असताना देखील अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहे. यात अमरावती जिल्ह्यातील साधारण ३५ टक्के शेतकऱ्यांना अद्याप मदतीची रक्कम मिळालेली नाही. 

राज्यात सर्वदूर जोरदार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक उध्वस्त झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या हातात शून्य उत्पादन असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात आले आहेत. तर शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली असून मात्र प्रत्यक्षात अनेकांना मदत मिळाली नसल्याचे चित्र आहे. 

शासनाने दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल; अशी हमी दिली होती. परंतु अमरावती जिल्ह्यात दिवाळी तोंडावर आली तरी आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांपैकी ३५ टक्के शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित आहेत. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनातर्फे सर्व शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडे पाठविण्यात आल्या. परंतु संचालित केल्या जाणाऱ्या थेट वितरण प्रणालीवर ताण आल्याने शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित राहिले आहे. 

१ लाख १३ हजार शेतकऱ्यांना मिळाली मदत 

जून ते सप्टेंबर या काळात अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झाले. यापैकी जून ते ऑगस्ट दरम्यान नुकसान झालेल्या १ लाख ७० हजार ७७३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यामध्ये शासनाने त्यांच्यासाठी १११ कोटी ४७ लाख २२ हजार रुपयाची तरतूद केली. परंतु अद्याप ती सर्वांपर्यंत पोहोचली नाही. आतापर्यंत १ लाख १३ हजार १३१ शेतकऱ्यांनाच ७२ कोटी ६२ लाख ७२ हजार रुपयांची मदत मिळाली. तर इतर शेतकऱ्यांचे ३८ कोटी ८४ लाख ५६ हजार रुपये अद्यापही वितरित व्हायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea Addiction: दुधाचा चहा पिताय? सावधान! शरीरावर होईल गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा

Leopard Attack : बिबट्यानं आधी हल्ला केला, मग फरफटत नेलं, वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूनं हळहळ

शनिवारवाड्यात आंदोलन! अनधिकृत पीर काढा, सकल हिंदू समाजाची मागणी|VIDEO

Sadhvi Pragya Controversy Statement: पळून जाणाऱ्या मुलींच्या तंगड्या तोडा; साध्वी प्रज्ञासिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT