Amravati: आता शिवसेनेनं बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला
Amravati: आता शिवसेनेनं बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला Saam Tv
महाराष्ट्र

Amravati: आता शिवसेनेनं बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर (Daryapur) येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा हटवण्यात आला आहे. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दर्यापूर पोलीस आणि नगरपालिका (Municipality) प्रशासनाने ही कारवाई केली आहे. रविवारच्या रात्री शिवसेनेने (Shiv Sena) शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. दर्यापूर (Daryapur) येथील पुतळा अनधिकृत असल्याने शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला आहे. यानंतर दर्यापूर येथे पोलिसांचा (police) मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता दर्यापूर येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील पहा-

अमरावती शहरात राजापेठ उड्डाणपुलावर महापालिकेचे पुतळा हटविल्यानंतर अमरावती (Amravati) शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता. दरम्यान अमरावतीच्या ग्रामीण भागातील दर्यापूर येथे देखील मध्यरात्री विनापरवानगी बसविलेला पुतळा हटविल्याने दर्यापूर शहरात (city) सकाळपासून तणाव निर्माण झाला आहे. यामुळे आज सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी दर्यापूर बंदची हाक दिली आहे. पुतळा हटवल्याने पालिकेचा निषेध देखील करण्यात येत आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त दर्यापूर शहरात तैनात करण्यात आला आहे. शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये, या परिस्थितीवर पोलीस लक्ष देऊन आहेत.

राजमाता जिजाऊ माता यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी अमरावती मधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj statue) बसवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आता महानगरपालिकने (Municipal Corporation) हटविला आहे. आमदार रवी राणा यांनी विना परवानगी शिवरायांचा हा पुतळा बसविला होता. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी २ दिवसांपूर्वी महापालिकेत केली होती. पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले असून यामध्ये शिव प्रतिष्ठानने सुद्धा उडी घेतल्याचे समजत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: सोप्या पद्धतीचे इंडियन नुडल्स; चिमुकले होतील खुश

Mankhurd Shawrma News | शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय तरूणाचा मृत्यू, दोघांना अटक

Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सेवा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशिराने

Hair Care Tips: केसांमधील गुंता कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

Morning Excercise: सकाळी अर्धातास करा व्यायाम, ब्लड शुगर राहील नियंत्रणात

SCROLL FOR NEXT