Amravati Shivaji Maharaj Idol अरुण जोशी
महाराष्ट्र

अमरावती महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने हटवला शिवरायांचा पुतळा

अरुण जोशी

अमरावती - राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी आमदार रवी राणा यांनी बीना परवानगीने राजापेठ येथील उड्डाण पुलावर शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला. राजापेठ उड्डाण पुलाचे सर्व रस्ते काल रात्रीपासून बंद करण्यात आले होते. त्यानंतर हा पुतळा हटवण्यात आला. हा पुतळा महानगर पालिका (Amravati Municipal Corporation) व पोलीस प्रशासनानेमच्या (Police Administration) वतीने हटवण्यात आला आहे. (Amravati Municipal Corporation and police administration removed the statue of Shivaji Maharaj)

हे देखील पहा -

शिवाजी महाराज यांचा हा पुतळा हटवू नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि युवा स्वाभिमान पक्षाने केली होती. या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे.आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस आणि SRPF चा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी रवी राणा यांनी २ दिवसांपूर्वी महापालिकेत केली होती. या पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले असून यात शिव प्रतिष्ठानने सुद्धा उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

MVA News : मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

IND vs BAN 1st Test: W,W...आकाश 'दीप' पेटला! लागोपाठ 2 चेंडूंवर उडवल्या त्रिफळा; पाहा VIDEO

Patoda Bajar Samiti : पाटोदा बाजार समितीची ८१ गुंठे जमीन परस्पर विक्री; माजी सभापती विरोधात २६ वर्षांनी गुन्हा दाखल

Astrology Tips : काही केल्या लग्न जुळत नाहीये? वास्तुशास्त्रात दिलेले 'हे' उपाय एकदा करून तर पाहा

SCROLL FOR NEXT