Amravati  अरुण जोशी
महाराष्ट्र

मनपा आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण; वायएसपी शहर अध्यक्षाला अटक

या प्रकरणात आमदार राणा आणि इतर ११ आरोपींवर कलम अंतर्गत हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला होता

अरुण जोशी

अमरावती: अमरावतीचे मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर बुधवार ९ फेब्रुवारीला मानकपणे शाइफेक झाल्याने एकच बळ उडाली होती. हा सगळा प्रकार छत्रपती बाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याच्या रणातून घडला होता. या प्रकरणात आमदार राणा आणि इतर ११ आरोपींवर कलम अंतर्गत हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे या रणातील सर्व आरोपींना जामीन सुद्धा मिळाला आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणाच्या तपासा दरम्यान काही तथ्य कळल्याने अधिक तपासासाठी युवा स्वाभिमानी पार्टीचे अध्यक्ष संजय हिंगासपूरे यांना अटक करण्यात आली. ३० मार्च रोजी रात्री त्यांना निवासस्थानावरून त्यांना ताब्यात घेतले होते. राजापेठ पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणावरून अमरावतीत चांगलेच राजकीय वातावरण तापले होते. या सगळ्या प्रकारावर रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केले होते.

या संपूर्ण घटनेचया दरम्यान आमदार रवी राणा अमरावती शहरात नसतानाही त्यांच्यावर 307 सारखा गुन्हा दाखल करणे याकरता पोलिसांवर राजकीय दबाव आहे, असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणातील सर्व ११ आरोपींना जामीन मंजूर झाला. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसीपी भारत गायकवाड यांना तपासा दरम्यान या प्रकरणात युवा स्वाभिमानी पार्टीचे शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे यांच्या समावेशा बाबत काही तथ्य आढळले. त्यामुळे पुढच्या तपासासाठी राजापेठ पोलिसांनी बुधवारी रात्री संजय हिंगासपूरे यांना अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT