Express  Saam tv
महाराष्ट्र

Railway Service Disrupted : एक्स्प्रेस रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली; वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

Akola Railway Service Disrupted : अंबा एक्स्प्रेस रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही

रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याने नागपूरवरून मुबंईकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमरावती-मुंबई एक्स्प्रेसची ओव्हरहेड वायर तुटली आहे. अकोल्यातील मुर्तीजापूरजवळ या एक्स्प्रेसची ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे पुढील दीड तासांसाठी मुंबई मार्गाकडे जाणारी रेल्वे सेवा बंद झाली आहे.

अमरावती मुंबई एक्स्प्रेसची ओव्हरहेड वायर तुटल्याने अकोल्यातील मूर्तिजापूरपासून ४ किमी अंतरावर एक्सप्रेस थांबली आहे. रेल्वे विभागाकडून दुरुस्तीचं काम वेगाने सुरु केलं आहे. यामुळे पुढील दीड तास मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अमरावती-मुंबई एक्स्प्रेसमधील प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.

'अंबा एक्सप्रेस'ची ओव्हरहेड वायर तुटली

मुंबई-अमरावती 'अंबा एक्सप्रेस'ची ओव्हरहेड वायर तुटली. मुर्तीजापूरजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबई आणि हावडाकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमरावती एक्सप्रेससह, विदर्भ एक्सप्रेस, अमरावती पुणे एक्सप्रेस, नागपूर, पुणे एक्सप्रेस थांबवल्या आहेत.

ओव्हरहेड वायर जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ओव्हरहेड वायरचा बिघाड दूर करण्यात किमान दोन तासांचा अवधी लागणार आहे. मुंबई आणि हावडाकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. अनेक गाड्या नागपूर ते मुंबईदरम्यान थांबवण्यात आल्या आहेत. तांत्रिक बिघाडामुळे मुंबई आणि हावडाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT