Navneet Rana Latest Marathi News, Navneet Rana Saam TV
महाराष्ट्र

Navneet Rana : आदिवासी गाण्यावर नवनीत राणांनी धरला ठेका; नृत्य करतानाचा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Navneet Rana Dance Video : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा आदिवासी मुलांसोबत नृत्य करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नवनीत राणा यांनी आदिवासी गाण्यावर चांगलाच ठेका धरला. व्हिडीओमध्ये त्या आदिवासी मुलांसोबत पारंपरिक नृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल (Social Media) मीडियावरही व्हायरल होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, हा व्हिडिओ अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी येथील आहे. धारणी येथे राणा दाम्पत्याच्या वतीने दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या दहीहंडीच्या कार्यक्रमात आदिवासी मुलांनी नृत्य केलं. दरम्यान, मुलांना नृ्त्य करताना बघून नवनीत राणा यांनाही मोह आवरला नाही.

दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी आदिवासी मुलांसोबत नृत्य करत आनंद साजरा केला. अगदी पारंपरिक वेष भूषेत आदिवासी मुलांनी भन्नाट आदिवासी नृत्य करत सर्वांनी मन जिंकली. या दहीहंडी स्पर्धेत अभिनेता चंकी पांडे देखील उपस्थित होते. नवनीत राणांनी केलेल्या या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा दरवर्षी मेळघाटातील अनेक गावांमध्ये जावून आदिवासी बांधवांसोबत दहीहंडी साजरी करतात. यावर्षीदेखील ते मेळघाटातील विविध गावात गेले आणि आदिवासी नागरिकांसोबत दहीहंडी साजरी केली. विशेष म्हणजे यावर्षी नवनीत राणा यांनी आदिवासी मुलांसोबत पारंपारिक आदिवासी नृत्य करुन दहीहंडी साजरी केली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : धावत्या स्कूल बसमधून पडली, चाकाखाली चिरडून ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Gas Cylinder: इंधनाचा प्रश्न लवकरच सुटणार? PM मोदींनी उचललं मोठं पाऊल; इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत नेमकी काय चर्चा झाली?

Besan Face Pack For Tan Removal Skin: चमकदार त्वचेसाठी लावा 'बेसन फेस पॅक', टॅनिंगही निघून जाईल

LPG cylinder shortage: गॅस सिलिंडरच्या संपला, कामगारांनी देसी जुगाड करत बनवलं जेवण; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा जनता दरबार सुरू

SCROLL FOR NEXT