Sharad Pawar/Narendra Modi Saam TV
महाराष्ट्र

"भाजप व राष्ट्रवादी युती झाल्यास आश्चर्य वाटू नये"

शरद पवार वेगळ्या दिशेने बोलतात व करतात वेगळं त्यामुळे काहीही होऊ शकते असेही रवी राणा म्हणालेत.

अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत भेट झाली.या भेटीमागे दडलंय काय याबद्दलच्या अनेक राजकीय चर्चांना उधाण आले. मात्र चर्चा काय झाली याबद्दल खुद्द शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. या भेटीनंतर राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा होत असताना, आता युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी प्रतिक्रिया देत राज्यात भाजप -राष्ट्रवादी युती झाल्यास आच्छर्य वाटू नये, असं अमरावतीत विधान त्यांनी केले आहे. शरद पवार वेगळ्या दिशेने बोलतात व करतात वेगळं त्यामुळे काहीही होऊ शकते असेही रवी राणा म्हणालेत.

संजय राऊत व अनिल परब यांच्यामुळे मातोश्री अडचणीत येऊ शकते;

शिवसेना खासदार संजय राऊतांची मुंबई आणि अलिबागमधली संपत्ती ईडीने जप्त केली यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "संजय राऊत व शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुळे मातोश्री अडचणीत येऊ शकते, असं खळबळजनक विधान आमदार रवी राणा यांनी केलं. कारण मुंबई महानगरपालिका मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. तसेच सरकार मधील सर्व पैसे हे मातोश्रीवर पोहचले जातात. हे पैसे अनिल परब व संजय राऊत यांच्या मार्फत जातात. त्यामुळे मातोश्री अडचणीत येऊ शकते अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली.

हे देखील पहा-

दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपविरोधात उभी आहे. आम्ही कधीच भाजप सोबत नव्हतो असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. 'भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतीही कटुता नाही, ही कटुता शिवसेनेसोबत (Shivsena) नक्की आहे. जनादेशाचा अवमान सेनेने केला. त्यामुळे सेना-भाजपमध्ये नक्कीच कटुता आहे. पण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सलोख्याचे संबंध आहे.' असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलं होत मात्र आम्ही कधीच भाजपसोबत नव्हतो असं म्हणत पवारांनी मुनगंटीवारांच्या वक्तव्याला उत्तर दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT