Amravati Crime News Saam TV
महाराष्ट्र

धक्कादायक! तरुणीला मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह; गोमांस खाण्यासही केलं प्रवृत्त

सहा महिन्यापूर्वी शेख रईस या तरुणाने आपणाला पळवून हैदराबाद येथे नेलं व मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे -

अमरावती: अमरावती जिल्ह्यात लव जिहाद (Love Jihad) आंतरधर्मीय विवाहाचे रोज नवी प्रकरणं समोर येत आहेत. गेल्या सहा महिन्यापूर्वी मेळघाटातील धारणी येथील २३ वर्षीय तरुणीला अकोट येथून शेख रईस या तरुणाने पळवून तिला हैदराबाद (Hyderabad) येथे नेले व मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सहा महिन्यापूर्वी शेख रईस या तरुणाने आपणाला पळवून हैदराबाद येथे नेलं व मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह केला. शिवाय जिवे मारण्याची धमकी देत तरुणीला मुस्लिम धर्म परिवर्तनसाठी प्रवृत्त करत गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

पाहा व्हिडीओ -

अखेर शेख रईस बाहेर गेल्याची संधी साधून या तरुणीने आपली आपबिती आईला फोन वरून सांगितली. ३ दिवसांपूर्वी तिला नातेवाईकांनी तिची कशीबशी सुटका करून दिला घरी आणले, आता सदर तरुणी सुखरूप असून तिने आपल्यावर होत असलेली अत्याचाराची सर्व माहिती प्रसार माध्यमांसमोर मांडली आहे.

सदर युवतीला बळजबरीने पळवून नेल्यानंतर घटनेची तक्रार धारणी पोलीस ठाण्यात (Dharni Police Station) करण्यात आलेली होती. मात्र, धारणी पोलिसांनी या प्रकरणात कमालीचा हलगर्जीपणा केला असा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केला.

मुलीला जबरदस्तीने पळवून नेणाऱ्या शेख रईस व त्याला सहकार्य करणाऱ्या सर्व कुटुंबा वर कारवाई करून त्यांना अटक करावी व मुलीचा शोध न घेणाऱ्या धारनी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात मोठे फेरबदल; एकाचवेळी २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Bank Holiday News: पुढील आठवड्यात सलग 4 दिवस बँका बंद; SBI, HDFC सह सर्व बँकांच्या ग्राहकांनी आधीच तपासा सुट्ट्यांची यादी

Maharashtra News Live Update: जुन्नर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; गुंजाळवाडी, वडगाव सहाणी आणि सावरगाव परिसराला दिलासा

रोज सकाळी प्या मनुक्याचं पाणी, हे 5 आजार दूर होतील

विकृतीचा कळस! ६० वर्षीय नराधमांचा 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; कल्याण हादरलं

SCROLL FOR NEXT