Bacchu Kadu vs Ravi Rana on Amravati Lok Sabha constituency Saam Tv
महाराष्ट्र

Ravi Rana Vs Bachchu Kadu: काही लोक फक्त नौटंकी करण्यासाठी राजकारणात; रवी राणांचा बच्चू कडूंवर 'प्रहार'

Amravati Politics News: नवनीत राणा यांचे डिपोझीट जप्त होईल, असा टोलाही त्यांनी लगावला होता. बच्चू कडू यांच्या या टीकेवरुन रवी राणा यांनी जोरदार पलटवार केला आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी|ता. २ एप्रिल २०२४

Amravati Loksabha Constituency News:

अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या उमेदवारीला प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा जोरदार विरोध पाहायला मिळत आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडू यांनी त्यांच्या विरोधात उमेदवारही जाहीर केला आहे. तसेच नवनीत राणा यांचे डिपोझीट जप्त होईल, असा टोलाही त्यांनी लगावला होता. बच्चू कडू यांच्या या टीकेवरुन रवी राणा यांनी जोरदार पलटवार केला आहे. (Maharashtra Loksabha News)

काय म्हणाले रवी राणा?

"काही लोक फक्त राजकारण करतात नौटंकी करतात. बोलणं फार सोपं आहे. ते आता आंतरराष्ट्रीय नेते झाले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवक्ते झाल्यामुळे ते फार बोलू शकतात. अमेरिकेचे जे राष्ट्रपती होते डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागी बच्चू कडू यांना बसवलं पाहिजे ते अमेरिकेतून बसून देशावर लक्ष ठेवेल आणि देशाचे भल होईल," असा टोला रवी राणा (Ravi Rana) यांनी लगावला आहे.

तसेच "काही लोक फक्त नौटंकी करण्यासाठी राजकारणात आले आहेत. वेळ आल्यावर बच्चू कडूंना (Bachchu Kadu) योग्य उत्तर देईल. माझी कुठलीही चौकशी करा मी समोर जायला तयार आहे, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाकीत खर होईल आणि त्या 3 लाख मतांनी विजयी होतील, असा दावाही रवी राणा यांनी यावेळी केला.

काय म्हणाले होते बच्चू कडू?

प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरुन आणि साडी वाटपावरुन जोरदार टीका केली होती. 2 कोटीच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयाच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका, असा टोला त्यांनी लगावला होता. तसेच नवनीत राणा यांना दोन लाखांच्या मतांनी पराभूत करु, वेळप्रसंगी नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त करु असा इशारा देखील दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit: कुरळे केस अन् केशरी साडी, तेजस्विनीचं सौंदर्य पाहून व्हाल घायाळ

Eknath Shinde Shivsena : नगरमध्ये चक्क पक्ष प्रवेश घोटाळा? शिंदे गटाच्या नेत्यावर बोगस यादीचा आरोप, राजकारण तापलं

Ladki Bahin Yojana: सोलापुरातील ४३० भावांनी लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, महिनाभरात इतक्या लाखांची वसूली होणार

Freshers Job Hiring : IT फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी! इन्फोसिसकडून २०,००० पदांसाठी भरती

Chest Pain : छातीत दुखण्याचे कारण हार्ट अटॅक आहे कि गॅस, कसे ओळखाल? जाणून घ्या सविस्तर माहीती

SCROLL FOR NEXT