Amravati Hospital Blast Saam Tv
महाराष्ट्र

Amravati News: अमरावती रुग्णालयातील स्फोटाचा VIDEO समोर, ३ नवजात बाळांचा झाला होता मृत्यू

Amravati Hospital Blast: अमरावतीमध्ये एका रुग्णालयात स्फोट होऊन ३ नवजात बाळांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More
  • अमरावती रुग्णालयातील स्फोटाचा CCTV व्हिडीओ समोर

  • अमरावती रुग्णालयातील स्फोटात तीन नवजात बाळांचा मृत्यू

  • काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी केले गंभीर आरोप

  • अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग प्रकरणाचा तपास सुरू

अमर घटारे, अमरावती

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालक मृत्यू प्रकरणाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेस नेते डॉ सुनील देशमुख यांनी सीसीटीव्ही व्हिडिओ बाहेर काढला. २४ ऑगस्ट रोजी अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन ३ बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुनील देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत.

या अहवालात रुग्णालयात स्फोट झाला त्यावेळी परिचारिका नवजात बालकाला फीडिंग करत असल्याचा उल्लेख करण्यात आला. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन नवजात कक्षाच्या बाहेर कक्ष सेविका झोपल्याचे दिसत आहे. स्फोट झाल्यानंतर काही वेळाने या अती दक्षता विभागात बाहेर झोपलेल्या कक्षसेविका तसेच बाजूच्या वार्डातील परिचारिका आणि डॉक्टर आत गेल्याचे दिसत आहे.

त्यामुळे अहवालात दिलेली माहिती आणि वस्तूस्तिती ही वेगळी असल्याचं दिसून येत आहे. हा अहवाल मुळात स्क्रिप्टेड अहवाल असल्याचा डॉक्टर सुनील देशमुख यांचा आरोप आहे. याप्रकरणी निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर, निकृष्ट दर्जाचे फायर सिस्टीम बसवणारे कंत्राट दारावर कुठलीही कारवाई केली नसल्याचा सुनील देशमुख यांचा आरोप आहे.

हे कंत्राटदार भाजपच्या नेत्यांच्या जवळचे असल्याचा देखील सुनील देशमुख यांचा गंभीर आरोप आहे. परिचारिका आत झोपल्या असत्या तर त्यांनी लगेच वीजपुरवठा बंद केला असता तर आग आटोक्यात आली असती, बालकांचा जीव वाचला असता सुनील देशमुख यांचा दावा आहे.

अमरावती रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट झाला तेव्हा कक्षसेविका झोपेत होत्या. व्हेंटिलेटर फुटायच्या आधी तीन वेळा आग लागली होती हे सीसीटीव्ही व्हडीओत स्पष्ट दिसत आहे. टॉपनर्स आणि कक्षसेविका ह्या SNCU मध्ये न झोपता पोर्च मध्ये झोपल्याचे दिसत आहे. जर त्या आत झोपल्या असत्या तर वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आलं असतं असे मत सुनील देशमुख यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

राज्यसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये मोठा भूकंप होणार? अनेक नेते बदलणार पक्ष;बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

तुम्हीही दिवसभर एकाच जागी बसून काम करता? आरोग्यावर होऊ शकतात 5 गंभीर परिणाम; वेळीच घ्या काळजी

Thursday Horoscope: या 3 राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास; पैशांपासून कामाच्या संधीपर्यंत मिळणार मोठी खुशखबर!

Bike Tyre Pressure: कडक उन्हात बाईकच्या टायरमध्ये किती हवा असली पाहिजे?

SCROLL FOR NEXT