Amravati Food Poisoning News Saamtv
महाराष्ट्र

Amravati Food Poisoning: वरातीचे जेवण महागात पडले! २७ जणांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू

Amravati Food Poisoning News: पोटदुखी, मळमळ,जुलाब होऊ लागल्याने सर्वांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी...

Food Poisoning In Wedding Ceremony: लग्नाच्या एका वरात पंगतीत जेवल्यानंतर 27 जणांना विष बाधा झाल्याची घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यतील येलकीपूर्णा येथे हा प्रकार घडला असून रुग्णांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यतील येलकीपूर्णा येथे एका लग्न सोहळ्याच्या (Wedding) कार्यक्रमात २७ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या वरात पंगतीत जेवल्यानंतर अनेकांची प्रकृती बिघडली. (Amravati News)

अचानक अस्वस्थ होऊन पोटदुखी, मळमळ,जुलाब होऊ लागल्याने सर्वांना तात्काळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तपासणी केली असता जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

सध्या सर्वांवर उपचार सुरू असून रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णांना काही तास रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार कऱण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच आमदार बळवंत वानखडे यांनी रुग्णालयात धाव घेत चौकशी केली. दरम्यान, या प्रकारानंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra politics : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात पुन्हा खिंडार, शिंदेंच्या शिवसेनेत अनेकांचा प्रवेश

Amravati Tourism : विदर्भात लपलाय ऐतिहासिक किल्ला, हिवाळ्यात करा ट्रेकिंगचा प्लान

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT