Heavy Rain Amravati: जिल्ह्यात नद्या, नाल्यांना पूर परिस्थिती अरुण जोशी
महाराष्ट्र

Heavy Rain Amravati: जिल्ह्यात नद्या, नाल्यांना पूर परिस्थिती

जिल्ह्यातील उध्ववर्धा प्रकल्प, तसेच लहान- मोठ्या धरणात जलसाठा वाढला असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले

अरुण जोशी

अमरावती : जिल्हयात बुधवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा मुसळधार पाऊस पडल्याने, अमरावती जिल्ह्यातील उध्ववर्धा प्रकल्प, तसेच लहान- मोठ्या धरणात जलसाठा वाढला असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी नदीकाठी असलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे, तर तिवसा तालुक्यात मागील ३ दिवसापासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने तालुक्याच्या अनेक गावात पावसाचे पाणी शिरले आहे.

हे देखील पहा-

यामध्ये कुऱ्हा, शिरजगाव, मोझरी, शिवणगाव, वरखेड यासह पुनर्वसित धारवाडा, दुर्गवाडा या गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. तसेच तालुक्यातील अनेक गावाच्या नदीला पुराचे स्वरूप आल्याने नागरिकांच्या घरात पाणीच पाणी झाले आहे. मदतीकरिता प्रशासन तसेच सामाजिक कार्यकर्ते पुढे येत आहे. तर तिवसा तहसीलदार वैभव फरतारे आणि रेस्क्यू पथकाच्या मदतीने आज सकाळापासूनच अनेक ठिकाणी पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याकरिता शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

चांदूर रेल्वे तालुक्यातील सरस्वती तलाव, टाकळी तलाव, मालखेड तलाव आणि सोनगाव शिवणी तलाव यामध्ये १०० टक्के जलसाठा झाला आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी संगम, एकपाळा, राजुरा, बोरी, मोगरा, धोत्रा या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड- खिराळा मार्गाच्या मधातून वाहणाऱ्या चंद्र सूर्या नाल्यावर कमी उंचीचा पुल आहे.

या पुलावरून निमखेड बाजार ग्रामपंचायतीचे कर्मचारी साहेबखाँ बनेरखाँं (वय- ५८) आपली दुचाकी लोटत नेताना नदीत वाहून गेले आहेत. ही घटना सायंकाळच्या दरम्यान घडली आहे. गाडी लोटताना पाय घसरल्याने ते खाली पडले आणि नदीच्या पुरात वाहून गेले आहेत. साहेबखाँ यांना शोधून काढण्याची शोध मोहीम प्रशासनाकडून सुरू होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक संजय केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT