amravati district bank  
महाराष्ट्र

अमरावती बॅंक : सुधाकर भारसाकळे अध्यक्ष, सुरेश साबळे उपाध्यक्ष

अरुण जोशी

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाराव्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदा करीता आज (बुधवार) बँकेच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलचे सुधाकर नारायणराव भारसाकळे आणि सुरेश बापूरावजी साबळे हे विजयी झाले. सुधाकर भारसाकळे हे बॅंकेचे अध्यक्षपद भुषविणार आहेत तर सुरेश साबळे हे उपाध्यक्षपदाचा कारभार पाहणार आहेत.

चार ऑक्टोबरला बॅंकेच्या १७ संचालकपदाच्या जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत सहकार पॅनलने तब्बल १२ जागा जिंकल्या. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर उर्वरित चार जागा परिवर्तन पॅनलने जिंकल्या. बिनविरोध विजयी झालेल्यांमध्ये दोन्ही पॅनलचा प्रत्येकी एक संचालक असून उर्वरित दोन संचालक तटस्थ होते.

आज (बुधवार) बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुक झाली. जिल्हा बँकेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया झाली. परिवर्तन पॅनलचे राज्यमंत्री बच्चू कडू ,अजय मेहकरे ,चित्रा डहाणे ,आनंद काळे व जयप्रकाश पटेल यांच्या वतीने अध्यक्षपदासाठी जयप्रकाश पटेल व उपाध्यक्ष पदाकरिता आनंद काळे यांनी नामांकन दाखल केले हाेते.

या निवडणुकीत सहकार पॅनलच्या उमेदवारास १५ तर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारास सहा मते मिळाली. यानंतर पिठासीन अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी सुधाकर भारसाकळे यांची अध्यक्ष तसेच सुरेश साबळे यांची उपाध्यक्ष पदासाठी विजयी झाल्याची घोषणा केली.

बॅंकेच्या निवडणुकी दरम्यान अनेक आक्षेप सहकार पॅनलवर लावण्यात आले होते मात्र विरोधकांच्या हाती काही लागले नाही. बँकेचे सभासद, शेतकरी हे सहकार पॅनलच्या पाठीशी खंबरीपणे उभे राहिले व विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली असल्याची प्रतिक्रिया बबलू देशमुख यांनी यावेळी दिली.

बँकेवर जे आरोप विरोधकांनी केले ते सर्व बिनबुडाचे आहेत. येत्या काही दिवसांतच तुम्हांला दूध का दूध आणि पानी का पानी पाहायला मिळणार आहे. त्या आरोपमध्ये काही तथ्य नाही. सहकार पॅनल नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे पॅनल आहे, यापुढे ही आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करत राहू व बँकेला अजून उंच शिखरावर नेऊ अशी भावना नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांनी व्यक्त केली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तलवारीचा व बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटले

Kajol: लग्नाचीही एक्सपायरी डेट असली पाहिजे...; काजोलच्या वक्तव्यावर नेटकरी चिडले; म्हणाले, त्याला घटस्फोट...

Indurikar Maharaj Name History: इंदुरीकर महाराजांना 'इंदुरीकर' हे नाव कसं पडलं?

Nashik Politics: नाशिकमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

भाजपमध्ये इनकमिंगचा धडाका; ठाकरे बंधूंना धक्का, बड्या नेत्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं

SCROLL FOR NEXT