Amravati Crime Saam tv
महाराष्ट्र

Amravati Crime : दारू पिण्यासाठी पैसे मागत त्रास दिल्याने राग अनावर; तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Amravati News : अमरावती शहरातील खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीतील राऊत वाडी परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. घटनेतील मृतकाचे ओळख पटलेली नाही. दरम्यान मृत तरुण आणि मारेकरी हे एकमेकांना ओळखत नव्हते

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : दारू पिण्याचे व्यसन असल्याने सातत्याने दारू पिण्यासाठी पैसे मागत त्रास द्यायचा. वारंवार होत असलेल्या पैशांची मागणी होत असल्याने राग अनावर झाला. यातून एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना अमरावती शहरात रात्रीच्या सुमारास घडली आहे. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. 

अमरावती शहरातील खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीतील राऊत वाडी परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. घटनेतील मृतकाचे ओळख पटलेली नाही. दरम्यान घटनेत मृत तरुण आणि मारेकरी हे एकमेकांना ओळखत नव्हते. मात्र परिसरात मृत तरुण हा दारू पिण्यासाठी वारंवार पैशांची मागणी करत होता. बऱ्याचदा यातून वाद देखील झाले होते. त्यानुसार रात्री मृत संबंधितांकडे पैशांची मागणी करू लागला होता. 

राग अनावर होऊन डोक्यात घातला दगड 
रात्री राऊत वाडी परिसरात मृत तरुण दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करू लागला. वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून राग अनावर झाल्याने तिघांनी मिळून तरुणाला मारहाण केली. यानंतर त्याच्या डोक्यात दगडाने वार करत हत्या केली. दरम्यान या नंतर तिघा संशयित आरोपींनी पोलीस स्टेशनला जाऊन आत्मसर्पण केलं आहे. आरोपी देखील मृतकला नावाने ओळखत नाहीत. त्यामुळे मृतक कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे. 


पोलिसांकडून तपास सुरु 
दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करत तपासाला सुरवात केली आहे. तर अद्याप पर्यंत मृतकाची ओळख पटली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाची आता सखोल चौकशी सुरू झाली आहे. मात्र रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

Pune : गे डेटिंग ॲपवर तरुणाला ओळख करणं पडलं महागात; भेटायला बोलावलं अन् भयंकर घडलं

Hantavirus Symptoms: 'हंटा व्हायरस' म्हणजे काय? शरीरात कसा परसतो? 'ही' 5 लक्षणे दिसल्यास व्हा सावध

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

SCROLL FOR NEXT