Amravati Crime Saam tv
महाराष्ट्र

Amravati Crime : पत्नीनेच घडवून आणला पतीवर हल्ला; धक्कादायक कारण आले समोर, पत्नीसह तिघेजण ताब्यात

Amravati News: पती अजय संजय राठी (वय ३१) हे दोघे २५ एप्रिलला दुचाकीने थंडपेय पिण्याकरिता पराबाहेर निघाले होते. यावेळी अकोली रेल्वेफाटकाच्या डाव्या बाजू‌ने तिघा जणांनी त्यांची दुचाकी अडविली

Rajesh Sonwane

अमरावती : पती- पत्नी दुचाकीने जात असताना त्यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर तिघांनी हल्ला करत लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात पतीवर हल्ला करण्यासाठी पत्नीनेच सुपारी दिली होती. यानंतर लूटमार केलेले दागिने पत्नीने घेतले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पत्नीसह चौघांना अटक केली.

अमरावती जिल्ह्यातील येरला मोर्शी येथील ममता अजय राठी, चेतन जय टांक (वय १९), करण संतोप मुंदाने (वय १९, दोघेही रा. आर्थी, जि. वर्धा) व स्मित संजय बोबडे (वय १९, रा. मांगीलाल प्लॉट, अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान ममता राठी यांचे पती अजय संजय राठी (वय ३१) हे दोघे २५ एप्रिलला दुचाकीने थंडपेय पिण्याकरिता पराबाहेर निघाले होते. यावेळी अकोली रेल्वेफाटकाच्या डाव्या बाजू‌ने तिघा जणांनी त्यांची दुचाकी अडविली. यानंतर राठी यांच्यावर वार करून जखमी केले. 

९५ हजार रुपयांचा ऐवज नेला लुटून 
दुचाकी अडवून मारहाण केल्यानंतर हल्लेखोरांनी सोन्याचा गोफ व पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या असा ९५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. या प्रकरणी खोलापुरीगेट ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान पोलिस निरीक्षक आलाराम चोरमले यांच्या पथकाने नागपूरवरून आधी संशयित चेतन टांक याला पकडले. त्याने याप्रकरणात सहभागी दोघे साथीदारांची नावे व घटनाक्रम उघड केल्याने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे. 

चौघेजण ताब्यात 
दरम्यान हल्ला करणारा संशयित चेतन हा ममता राठी या महिलेचा नातेवाईक आहे. ममता राठी यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर ममता राठी यांच्यासह हल्ला करणाऱ्या तिघा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर लूटमार करण्यात आलेले दागिने महिलेकडे असल्याचा उलगडा देखील तपासात झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

आम्ही नाही आणली भाड्याची माणसं... शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची शेरोशायरी|VIDEO

Maharashtra Live News Update : शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची पुणे येथे जाहीर सभा

Uddhav-Raj Thackeray Rally: ठाकरे मराठी माणसांचे 'सुरक्षाकवच'; भाऊकी जोमात, विरोधक कोमात

SCROLL FOR NEXT