Amravati Crime news Saam Tv News
महाराष्ट्र

तहसीलदारांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न; अमरावतीत वाळू माफियांचा प्रताप, घटना कॅमेऱ्यात कैद

Sand Mafia: भातकुलीतील हातुर्णा नदीपात्रात तहसीलदारांवर ट्रक नेण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद. वाळू उत्खनन करताना मजूर पळून गेले, आरोपीविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांनी एक मिनी ट्रक जप्त केला.

Bhagyashree Kamble

  • भातकुलीतील हातुर्णा नदीपात्रात तहसीलदारांवर ट्रक नेण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यात कैद.

  • वाळू उत्खनन करताना मजूर पळून गेले, आरोपीविरोधात गुन्हा दाखल.

  • पोलिसांनी एक मिनी ट्रक जप्त केला.

अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वाळू माफियांकडून चक्क तहसीलदारांच्या अंगावर ट्रक नेण्याचा प्रयत्न झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. अधिकारी असल्याचं लक्षात येताच नदीपात्रातून उत्खनन करीत असलेले मजूर देखील रफुचक्कर झाले. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी गुन्हा नोंदवत मिनी ट्रॅक जप्त केला आहे.

ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील हातुर्णा येथील पेढी नदीपात्राजवळ घडली आहे. वाळू माफियांनी थेट तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक घालण्याचा प्रयत्न केला. संबंधित प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याची ओळख पटताच उत्खनन करत असलेले मजूर घटनास्थळावरून फरार झाले.

दरम्यान, या घटनेबाबत मंडळ अधिकाऱ्यांनी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच नदीपात्रातून एका मिनी ट्रॅकही जप्त केला आहे. या प्रकारामुळे अमरावती जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननाचे वास्तव समोर आले आहे.

वाळूच्या या अवैध तस्करीमुळे शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत आहे. या पार्श्वभूमीवर, वाळू माफियांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन कोणत्या ठोस उपाययोजना करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT