crime news saam tv
महाराष्ट्र

Amravati Crime News: एकाच रात्री दोन बँका फोडण्याचा प्रयत्न, बँकेत कॅशच नसल्याने चोरटे हैराण

अमरावती जिल्यातील चांदुर बाजार तालुक्यात एकाच रात्रीत दोन बँक फोडण्याचा प्रयत्न झालाय.

अरुण जोशी

अमरावती: अमरावती जिल्यातील चांदुर बाजार तालुक्यात एकाच रात्रीत दोन बँक फोडण्याचा प्रयत्न झालाय. मात्र, या दोन्ही बँकेत पैसे नसल्याने चोरटे हैराण झाले आहेत. दोन्ही बँकेतील कॅश सुरक्षित असून अज्ञात इसमाविरुद्ध चांदुर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Amravati Crime News Robbers Try To Broke Two Banks In One Night).

तळवेल येथे सोमवारी मध्यरात्री अज्ञात इसमाने स्थानिक सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India) शाखा तळवेल आणि अमरावती (Amravati) मध्यवर्ती बँक फोडून चोरी (Robbery) करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा प्रयत्न फसला आणि दोन्ही बँकेमधून काही खास हाती लागले नाही (Amravati Crime News Robbers Try To Broke Two Banks In One Night).

आज स्थानिक नागरिकांना दोन्ही बँकेचे दरवाचे उघडे दिसल्याने त्यांना शंका आली म्हणून त्यांनी त्वरित कर्मचाऱ्यांना संपर्क केला. माहिती मिळताच चांदुर बाजार स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास केला.

दोन्ही बँकेतील कॅश सुरक्षित असून अज्ञात इसमाविरुद्ध चांदुर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती चांदुर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील किणगे यांनी दिली. मात्र, चोरट्याचा हा सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

तळवेल येथील सेंट्रल बँक आणि अमरावती मध्यवर्ती बँक या दोन्ही बँक स्थानिक आणि आजुबाजूच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा भाग असून बँकांमध्ये एकूण सात गावांचा समावेश आहे. सोमवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास दुचाकीवर 3 युवक स्वार होऊन बँक (Bank) फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, असे सेंट्रल बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. परंतु, चेहऱ्यावर कापड बांधला असल्याने अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही.

तर, अमरावती मध्यवर्ती बँकेतील कॅमेरे मागील काही दिवसांपासून बंद असल्याचे दिसून आले. गावातील दोन्ही बँका फोडून लुटण्याचे धाडस केले, परंतु त्यांना रिकाम्याच हाती परतावे लागले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

SCROLL FOR NEXT