Amravati crime news saam tv
महाराष्ट्र

Amravati Crime News: नवदांपत्याच्या आत्महत्येने अमरावतीत खळबळ; १० महिन्यांपूर्वीच केला होता प्रेमविवाह

Amravati Chinchkhed Crime: दोघांनी प्रेम विवाह केल्यामुळे परिवारांमध्ये थोडी नाराजी असल्याचेही समोर आले आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी...

Chinchkhed Crime News: अमरावती जिल्ह्यातून एक हादरवुन सोडणारी घटना उघडकीस आली आहे. अमरावतीच्या चिचखेडा येथील नवविवाहित जोडप्याने आत्महत्या केल्याचे समोर आली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या जोडप्याचा १० महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चिचखेडा येथील नवविवाहित जोडप्याने वझ्झरच्या प्रकल्पात आत्महत्या करून आपले जीवन संपले. तुलसी बारावे व विक्की बारवे असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.

या धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तुलसी व विक्कीचा दहा महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. तुलसी व विक्की या दोघांनी प्रेम विवाह केल्यामुळे परिवारांमध्ये थोडी नाराजी असल्याचेही समोर आले आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, विक्की हा शेती काम करून ट्रॅक्टर चालकाचे काम करत होता. एका वर्षाआधी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी विक्कीवर होती. मात्र आता दोघाही पती-पत्नीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पती पत्नीने हे टोकाचे पाऊल का उचलले असावे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या संपूर्ण घटनेचा तपास अचलपूर पोलीस करत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT