Nandurbar News: आदिवासी विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्य सेवेचे तीन तेरा; खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिकेत महिलेची प्रसुती

रुग्णवाहिका रस्त्यातच पंक्चर झाल्याने या महिलेची प्रसुती रस्त्यावरच करण्याची वेळ आली.
Nandurbar News
Nandurbar NewsSaamtv

सागर निकवाडे, प्रतिनिधी...

Nandurbar News: राज्याच्या आदिवासी विकास मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजलेचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. खराब रस्त्यामुळे आणि रुग्णवाहिकेचे चाक पंक्चर झाल्याने महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. (Nandurbar Latest News)

Nandurbar News
Pune Accident News: ती भेट अखेरची ठरली! मुलाला भेटून जाताना भरधाव वाहनाच्या धडकेत पित्याचा मृत्यू; सर्वत्र हळहळ

याबाबत अधिक माहिती अशी की, सातपुड्याच्या दुर्गम भागातील महिलेला बाळंतपणासाठी बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. त्यानंतर गरोदर महिलेला बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रसुतीसाठी नंदूरबार (Nandurbar News) जिल्हा रुग्णालयात पाठवायचे होते.

यावेळी जिल्हा रुग्णालयात आणणारी रुग्णवाहिका रस्त्यातच पंक्चर झाल्याने या महिलेची प्रसुती रस्त्यावरच करण्याची वेळ आली. रुग्णवाहिका पंक्चर झाल्यानंतर चालकाने मदतीसाठी प्रयत्न देखील केले. मात्र मदत न मिळाल्याने अखेर महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाली आहे. महिलेने यावेळी मुलाला जन्म दिला असून बाळ आणि आई दोन्ही सुखरुप आहेत.(Latest Marathi News)

Nandurbar News
Atapadi Krushi Utpanna Bazar Samiti : अखेरच्या क्षणी शिवसेनेची बाजी; आमदार गोपीचंद पडळकरांसह NCP ला मोठा धक्का

यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातून आलेल्या रुग्णावाहिकेतून संबंधित महिलेवर डॉक्टरांनी उपचार करत तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, वारंवार नादुरुस्त होणाऱ्या108 रुग्णवाहिका या डोकेदुखीचा विषय ठरत आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रुग्णवाहिकेत पर्यायी स्टेफनी नव्हती का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com