Morshi Police Station Saam Tv
महाराष्ट्र

प्रेम विवाह करणाऱ्या तरुणीची आई वडिलांच्या तावडीतून सुटका

दोघांनी 28 एप्रिल रोजी अमरावती येथे आर्य समाज मंदिर येथे विवाह केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती - मुलीने अंतर जातीय प्रेम विवाह केल्याने चिडलेल्या आई वडिलांनी मुलीला चक्क जनावरांप्रमाणे मारहाण करत फरपटत नेल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील अंबाडा या गावात घडली. सावरखेड येथील एका 19 वर्षीय तरुणीचे अंबाडा येथील प्रतिक तडस या युवकाशी प्रेम संबंध होते या दोघांनी 28 एप्रिल रोजी अमरावती (Amravati) येथे आर्य समाज मंदिर येथे विवाह केला.

हे देखील पाहा -

त्यानंतर मुलगी ४ मे रोजी घरून मुलाकडे निघून गेली. आई-वडिलांनी शोधाशोध केल्यानंतर ती अंबाडा येथे असल्याचे त्यांना समजताच मुलीकडील दहा ते बारा जण अंबाडा येथे पोहोचले व त्यांनी मुलीला फरपटत,मारहाण करत उचलून नेले.

प्रतिकने आपल्या पत्नीला मारहाण करून नेल्याची तक्रार मोर्शी पोलीस ठाण्यात केली. मात्र गेले तीन दिवसात पोलिसांनी काहीही कारवाई केली नव्हती. मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच काल रात्री उशिरा सदर युवतीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यातून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subodh Bhave- Mansi Naik Movie: सुबोध भावे आणि मानसी नाईक दिसणार एकत्र; 'सकाळ तर होऊ द्या' या दिवशी होणार रिलीज

Maharashtra Live News Update: आदिवासी विकासमंत्र्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Shivali Parab: शिवालीचं सौंदर्य खुललं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

उंच पाळणा बंद पडला, 30 ते 35 लोकांचा जीव टांगणीला, पाहा थरारक व्हिडिओ

Dhule : अतिक्रमण कारवाईत पोलिसांकडून मारहाण; भाजी विक्रेत्यांचा आरोप, संतप्त विक्रेत्यांनी केला रास्ता रोको

SCROLL FOR NEXT