Amravati News Saam Tv
महाराष्ट्र

Amravati: वारंवार पाईपलाईन फुटत असल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित, नागरिक त्रस्त

दोन दिवसांपूर्वी ही पाईपलाईन फुटल्याने अमरावती शहराचा पाणीपुरवठा पूर्णता बंद आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती - 10 लाख लोकसंख्या असलेल्या अमरावती (Amravati) शहराला अप्पर वर्धा धरणातून पाणी पुरवठा केला जातो मात्र या पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या पाईपलाईनचे तीस वर्षाच आयुष्य संपलेला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी ही पाईपलाईन फुटत आहे. दोन दिवसांपूर्वी ही पाईपलाईन फुटल्याने अमरावती शहराचा पाणीपुरवठा पूर्णता बंद आहे.

हे देखील पाहा -

ही पाईपलाईन निकामी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 688 कोटी रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. मात्र तो प्रस्ताव सध्या त्या ठिकाणी धूळखात पडत असल्याची माहिती अधीक्षक अभियंता यांनी दिली.

अमरावतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरनात मुबलक जलसाठा आहे. मात्र ही पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने व अमरावती शहराची लोकसंख्या 1990 च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहराला पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे लोकप्रतिनिधी तातडीने या पाईप लाईन कडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूचे वादळ; नागरिकांचे हाल, VIDEO

Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार? KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT