mother gave her own child 65 times burned shocks SaamTV
महाराष्ट्र

बाळाला श्वास घ्यायला त्रास, लालबुंद विळ्याने ६५ चटके; निर्दयीपणा करणारं दुसरं तिसरं कुणी नाही तर...

Amravati Baby Burned 65 Times : या प्रकरणात जन्मदात्या आईनेच बाळाला चटके दिल्याचं धक्कादायक वास्तव पोलीस तपासातून उघडकीस आलं आहे.

Prashant Patil

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चिखलदराच्या सिमोरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २२ दिवसाच्या बाळाला गरम विळा तापवून ६५ वेळा चटके देण्यात आलं आहे. गावातील भोंदूबाबाने हे चटके दिल्याची चर्चा असून, या संतापजनक घटनेमुळे अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर असून, रूग्णालयात उपचार सुरू आहे.

मात्र, या घटनेला आता धक्कादायक वळण लागलं आहे. या प्रकरणात जन्मदात्या आईनेच बाळाला चटके दिल्याचं धक्कादायक वास्तव पोलीस तपासातून उघडकीस आलं आहे. अमरावतीच्या चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ दिवसाच्या बाळाला तब्बल ६५ वेळा विड्याने चटके दिल्याची धक्कादायक घटना चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावात उघडकीस आली होती. त्यानंतर पोटच्या लेकाला आईनेच चटके दिल्याचा प्रताप समोर आला आहे.

आईविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन, बाल अत्याचार प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चटके दिलेल्या बाळाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नागपूरला पाठवण्यात आलं आहे. बाळाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने चटके देण्यात आले असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT