Yashomati thakur, Amravati APMC Election Results Saam TV
महाराष्ट्र

Amravati APMC Election Results : अमरावती जिल्ह्यातील बाजार समित्यांत महाविकास आघाडीचा बाेलबाला; तिवसात यशाेमती ठाकूरांचा जलवा (पाहा व्हिडिओ)

राज्यातील विविध जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल हाती येऊ लागले आहेत.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati Market Committee Election Results : अमरावती जिल्ह्यात सहा बाजार समितीची निवडणूक शुक्रवारी झाली. यामध्ये अमरावती वगळता अन्य बाजार समितीची मतमोजणी रात्री उशीरापर्यंत चालली. आगामी विधानसभेची रंगीत तालिम या अर्थाने झालेल्या या निवडणुकीत महाआघाडी समर्थित पॅनलने सर्वच पाच पैकी पाचही बाजार समित्यांमध्ये घवघवीत यश मिळविले आहे. (Breaking Marathi News)

यामध्ये तिवसा बाजार समितीत काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांचे सर्व १८ उमेदवार निवडून आले.

चांदूर रेल्वेत काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांचे 17 उमेदवार तर भाजप समर्थित पॅनलला 1 जागा.

मोर्शी येथे हर्षवर्धन देशमुख, यशोमती ठाकूर व आमदार देवेंद्र भुयार गटाचे १० संचालक विजयी झाले आहेत.

नांदगाव खंडेश्वरमध्ये अभिजित ढेपे व कमुनिस्ट पक्षाला 10 जागा मिळाल्या आहेत.

अंजनगाव सुर्जीत काँग्रेस आमदार बळवंत वानखेडे विरुद्ध अनंत साबळे गटाने 18 पैकी 17 जागा मिळवत विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत भाजप, शिंदे गट, प्रहार पॅनलचा पराभव झालेला आहे. मोर्शीमध्ये खासदार अनिल बोंडे यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. जिल्ह्यातील पाचही बाजार समितीत भाजप व शिंदे गटाला यश मिळालेले नाही. त्यातुलनेत यशोमती ठाकूर यांनी आपला गड राखला असून या विजया नंतर यशोमती ठाकुर यांनी कार्यकर्त्यांसमवेत गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला.

दरम्यान अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची मतमोजणी आज (शनिवार) आहे. अमरावती बाजार समितीत आमदार रवी राणांच्या पॅनल विरुद्ध काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या पॅनलमध्ये थेट लढत आहे. येथे आमदार रवी राणांचे भाऊ सुनील राणा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने रवी राणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिंदे सेना आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपाईंची युती

Fried Rice Recipe: घरीच बनवा स्ट्रीट स्टाइल फ्राईड राईस, लहान मुलं आवडीनं फस्त करतील डिश

Ind Vs Eng 4th Test : चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह- रिषभ पंत खेळणार? टीम इंडियाबाबत मोठी माहिती समोर

Patana Airport: लँडिग होऊ शकलं नाही, आकाशात घातल्या ४ घिरट्या नंतर...; १७३ प्रवाशांचा जीव टांगणीला

Sangli News: सांगलीचा रँचो! दहावीच्या मुलाने बनवली "ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम'

SCROLL FOR NEXT