माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट, आमदार बच्चू कडू यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र; अमरावतीत खळबळ
Mla Bacchu Kadu Latest News Saam TV
महाराष्ट्र

Bacchu Kadu VIDEO: माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट, आमदार बच्चू कडू यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र; अमरावतीत खळबळ

Satish Daud

अमरावतीच्या अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना एक खळबळजनक पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचं कटकारस्थान रचले जात आहे. जर माझ्या जीवास काही झाले, तर याची जबाबदारी आपली राहील, असं बच्चू कडू यांनी पत्रात म्हटलं आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी देखील बच्चू कडू यांनी पत्रात केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे अमरावती जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार बच्चू कडू यांचा घातपात करण्याचा कोणाचा प्लँन? अशा चर्चा शहरात सुरू झाल्या आहेत.

बच्चू कडू यांनी पत्रात काय म्हटलंय?

अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहलेल्या पत्रात बच्चू कडू म्हणतात, "आज सकाळी गोपनीय माहितीनुसार मला २ संदेश प्राप्त झाले आहे. त्यामधून पहिल्या संदेशामध्ये दि.०४/०५/२०२४ रोजी रात्रीच्या सुमारास विदर्भ मिल स्टॉप अचलपूर परिसरातील भाजीपाला विक्रेत्याजवळ दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून एक माणूस आला".

"भाजीपाला विक्रेत्यासबोत चर्चा करताना म्हणाला की, मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोली येथे राहत असून नक्षलवाद्यांशी माझे नजिकचे संबंध आहे. बच्चू कडूला पाहून घेऊ. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेला संपविले तसेच शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार. नाहीतर मीच स्वतः बच्चू कडूला संपवणार. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही".

"यानंतर त्याने खिशातून मोबाईल काढून मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्र्यांचे फोटो दाखवले. माझ्या डोक्यावर सर्वांचा हात असून मला कुणी काहीच करू शकत नाही. बच्चू कडूला पाहून घेऊ, असं या व्यक्तीने म्हटले". दुसऱ्या संदेशामध्ये चांदूर बाजार शहरामधील एका हॉटेलमध्ये ३ इसमांकडून माझ्या नावाचा वाकप्रचार करीत आज मौका देख के कडू का चौका मारेंगे असा संवाद करीत असल्याबाबत संदेशामध्ये नमूद आहे, असं कडू यांनी पोलिसांनी लिहलेल्या पत्रात म्हटलं.

इतकंच नाही, तर माझा अपघात झाला असल्याबाबतचे मला २ ते ३ दिवसापासून माझ्या मतदार संघातील कार्यकर्त्यांचे, नागरिकांचे फोन येत आहे. माझा अपघात झाला असल्याची अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. तरी प्राप्त झालेल्या गोपनिय माहीतीच्या अनुषंगाने उपरोक्त दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करून संबधित व्यतीवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्यात यावे. जर माझ्या जिवितेला धोका उद्भवल्यास याची जबाबदारी आपलेवर राहील, असं आमदार कडू यांनी पत्रात म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार, भक्त संपतापले; मंदिरातील चुकीच्या प्रथा कधी रोखणार?

Beed News: अंबाजोगाईत पहिला भव्य अश्व रिंगण सोहळा रंगला! सोहळ्यात वारकऱ्यांनी फुगड्या, कुस्ती खेळाचा लुटला आनंद

Nagar Manmad Highway Accident : योजनेचा लाभ घेण्याची इच्छा अधुरीच राहिली; तहसील कार्यालयाकडे जाताना वाहनाने उडवले, महिला जागीच ठार

VIDEO: नागरिकांच्या आरोग्याशी Kem हाॅस्पिटलचा खेळ, पेपर प्लेटसाठी वापरले रुग्णांचे रिपोर्ट; पाहा व्हिडिओ

Rrichest Thief: अट्टल चोराचं मुंबईत 1 कोटीचं घर, आलीशान ऑडी, लक्झरी हॉटेलात शाही थाट..!

SCROLL FOR NEXT